आपण स्वतःच्या ध्येयाला जास्त महत्व देतो आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो का?

ध्येय आणि कुटुंब हे दोन्हीही खुप जास्त महत्वाचे आहे.यामध्ये तरुण पिढी जास्त अडकल्या जाते.त्यामध्ये त्यांना खुप तारेवरची कसरत करावी लागते.त्यांनी त्यांच्या ध्येयाकडे लक्ष देऊन कुटुंबातकडे दुर्लक्ष केले तर आजूबाजूचे लोक जास्त टोचून बोलणारे असतात. हवे ते ध्येय साध्य करत असताना पाहिजे तसे यश नाही आले तरी टोचून बोलणारे लोक असतात.यामुळे तरुण पिढी ही खुप चिडीचिडी झाली आहे.यांना समजून घेणारी लोक त्यांच्या आजूबाजूला हवी असतात परंतु काही ना ते भेटते. काहींना अशी लोक सुद्धा जवळ नसतात ते मनातून पूर्ण कोलमडलेले असतात.त्यांना साथ देणारी माणसे पाहिजे असतात.ध्येयाबरोबर आपल्याला आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले पाहिजे.कुटुंबाबरोबर आपले ध्येय सुद्धा महत्वाचे आहे. ध्येय साध्य केले तर आपल्याकडे छोटी मोठी नोकरीं असेल.नोकरी असली की आर्थिक तरी आपण स्वतः उभे राहू शकू.आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा आर्थिक मदत करू शकतो.

 

Leave a Comment

Your email address will not be published.