अनामिक भीतीला नाव काय द्यायचे?

अनामिक भीतीला नाव काय द्यायचे?

भीतीला एवढे जवळ का करायचे ?

 

आपल्याला आयुष्यात कशाची तरी भीती ही वाटत असते. ती भीती काही केल्या आपल्या मनातून जात नाही. भीती वाटण्याचे काही प्रकार आहे जसे की एखाद्याला उंचीवर जाण्याची , बंद खोलीची , वादळ वारा पाऊस, लिफ्ट ची असे असंख्य प्रकारच्या भीती असतात .आपण गाडी चालवत असताना पडलो तर परत  अनामिक भीतीमुळे कितीतरी दिवस गाडीला हात न लावणे. यातली भीती म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा फोबिया असतो . हा फोबिया काही केले तरी हा फोबिया कधीच जाणार नसतो . अशा गोष्टींचा सामना करताना आपला हा फोबिया अचानक जागृत होतो. आपल्याला कितीही कोणी सांगितले की भिऊ नको तरी पण आपल्याला त्या गोष्टीची भीती ही आपल्या मनात ठासून भरलेली असते.
आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टींची सुरवात करत असताना आपल्याला सुरवातीपासूनच भीती ही वाटत असती की हे काम आपल्याकडून होईल का? काम नाही झाले तर त्याचे परिणाम काय असतिल ? हे असंख्य प्रश्न काम सुरु करण्याच्या आधीपासून मनात घोळत असतात. भीती वाटणे ही काही वाईट गोष्ट नाही ,ही खुप नैसर्गिक गोष्ट आहे. भीती ही आपली प्रतिक्रिया असते त्या होणाऱ्या गोष्टीबद्दल.
आयुष्यात आपल्याला जवळच्या माणसाला आपण आपल्याला चुकीमुळे गमावून बसण्याची भीती असते.आणि आपला माणूस आपल्यापासून लांब गेला की    माणूस अगदी मनातून खचून जातो. आणि अर्थात मानसिक आजार हे मागे लागतात. आपला जवळचा माणूस दूर जाऊ नये यासाठी आपण सतत तत्पर राहणे हे आपले काम आहे . नुसती मनात त्या गोष्ठीची भीती घेऊन बसण्यापेक्षा आपण काय केल्याने तो खुश होईल हा विचार करणे महत्वाचे.
गाडी चालवताना पडलो लागले तर कायम ती भीती आपल्या मनात घर करून बसता कामा नये . आपण गाडी चालवताना पडलो तर पुढच्या वेळेस गाडी चालवत असताना आपण अजून जास्त काळजी घेऊन गाडी चालवत असतो .
कोणत्याही गोष्टीची आव्हान स्वीकारताना आपण पहिले मनातून तयार होणे गरजेचे असते .त्या आव्हानामध्ये आपण काय करू शकतो आपण आपले किती कष्ट करून ते आव्हान अजून किती सोपे होईल हे बघणे गरजेचे आहे .
एकटेपणातील भीती तर माणसाला संपवून टाकणारी असती. म्हणून एकटेपणा हा खुप भयानक असतो आणि त्याचा सामना करणाऱ्या लोकांचे मन सांभाळून घेणे हे खुप गरजेचे असते . एकटेपणामुळे माणूस अगदी एकटा पडतो .एकटा पडल्याने तो त्याच्या मनातले विचार कोणाला न सांगता तो एकटाच विचार करत बसतो की तो अगदी गोंधळून जातो.  त्यामुळे एकटेपणा मध्ये तुम्ही असताल तर सगळ्यात आधी माणसांमध्ये जाऊन स्वतःला रमावं. आपला एकटेपणा हा समोरचा काही लगेच ओळखू शकत नाही. त्यामुळे एकटेपणात आपल्याला माणसाना आपल्या आजूबाजूला असू द्यावे.
अपयशाची भीती पण माणसाला खेचून टाकणारी असते. अपयश आले तर पुढ काय होणार ,आपल्याला कोण काय बोलेल ,आपल्यावरती कोणतरी हसेल ही भीती सतत आपल्या पुढे उभी असते. भीती ही एक आपली मानसिकता असते ती मानसिकता कोणी ही अशी सहजसहाजी कोणीही बदलू शकत नाही जोपर्यंत आपण ठरवत नाही आपल्या भीतीला आपण घाबरयच नाही तोपर्यंत ती भीती काही जाणार नाही.
प्रत्येकाची भीती ही वेगवेगळी असती. आपल्याला जी भीती वाटते तीच भीती आपल्या समोरच्या माणसाला वाटेल असे नाही. त्यामुळे प्रत्येकाचा फोबिया हा खुप वेगवेगळ्या पद्धतीचा असतो.
काही जणांना चार चौघात बोलण्याची खरंच अनामिक भीती असते. काही जण तिथे बोलण्याऐवजी मागे बडबड करत असतात. आपण जिथे बोलून फरक पडणार आहे तिथे बोलण्यात आपली ऊर्जा घालवावि. त्या परिस्थिती मध्ये तिथे बोलून आपले विचार, मत , आपली बोलण्याची पद्धत ,आपले शब्द , आपले वाक्य ,आपली बोलण्याची पद्धती, आवाजाचा टोण, कितीतरी गोष्टी आपला समोरचा माणूस बघत असतो . कुठेतरी भाषण देताना भीती वाटून तिथे त्या स्टेज वर काय बोलायचं हे सुद्धा माणूस विसरून जातो आणि परिणामी आपले भाषण छान होतं नाही . आपल्याला काय बोलायचं ,आपले मत  काय आहे हे आपण सगळ्यांना ओरडून सांगू शकत नाही काय तर फक्त आणि फक्त भीतीमुळे.ही अनामिक भीती आपल्या आयुष्यात खुप नुकसान करणारीच आहे. ही भीती आपल्याला आयुष्यात  पुढे जाण्यापेक्षा ती आपल्याला मागे खेचत असते आणि खुप काही करण्यापासून आपल्याला अडवत असते आणि त्या गोष्टीत आयुष्यात करून राहायच्या जाऊन जातात. या भीतीमुळे कदाचित ती गोष्ट आपल्याकडून होतच नाही.

अनामिक भीतीला नाव काय द्यावे?
अनामिक भीतीला नाव काय द्यावे?

ही भीती कोणीही किती सांगितले तरी आपल्याला त्याबद्दल तो फोबिया असतो तो कोणीच असे सांगून तो जात नाही जोपर्यंत ती भीती आपल्या मनातून जात नाही तोपर्यंत तरी ती जाणार नाही.
तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामाची त्यातून होणाऱ्या नुकसानाची भीती वाटत असणे . आपला मौल्यवान वेळ कुठे सत्कारणी लावावा हेसुद्धा  आपल्याला समजले तर आपल्या वेळेचे नुकसान हे होणार नाही.
नुकसान होईल म्हणूं तुम्ही कोणताच निर्णय घेणार नाहीत का? नुकसान होईल म्हणून ते काम तुम्ही तसेच ठेवणर आहात का? नाही केले तर तुमचा विकास तुमची प्रगती कशी होणार ?
भीती वाटणे हे गोष्ट कधीच कोणापासून लपवून ठेवू शकत नाही.ते नैसर्गिक असल्यामुळे ती भीती आपोआप सगळ्यांसमोर येत असते. कोणी आपल्याला हसेल म्हणून भीती आपण लववून ठेवू शकत नाही.
काहींना आपल्याबद्ल लोक काय बोलतील याची भीती वाटते मला लोक हसतील बोलतील अशी भीती वाटते . तसे आपण वागून त्यांना बोलायला संधी दिली नाही तर आपल्याला भीती वाटण्याची काही गरज नाही .
आपल्याला आपल्याला वाटत असणाऱ्या भीतीवर मात करायची आहे त्यासाठी त्या गोष्टीबद्दल आपल्याला काय भीती वाटते , ती भीती कशी जाईल यावर सकारात्मक विचार करून भीती ही आपल्यापासून दूर पळाली पाहिजे. सगळ्यांना मदत करणे ,सगळ्यांसोबत बोलत राहणे , कोणाला सल्ले पाहिजे असतील तर योग्य ते सल्ले देणे या गोष्टी सतत करत राहणे.
भीती आपल्यापासून दूर पळाली पाहिजे.सतत भिऊन जगत राहण्यापेक्षा आनंदी आयुष्य जगण्यात मज्जा आहे.
पुजा काळेल.

https://pgviral.com/wp-admin/post.php?post=14552&action=edit

Follow My Facebook Page  Facebook 

 

Leave a Comment

Your email address will not be published.