चर्चा करण्यात आता काही रस नाही

चर्चा करण्यात आता काही रस नाही.
जे काही झालं त्यात माझा दोष नाही

चर्चा करण्यात आता काही रस नाही

आयुष्यात चर्चेशिवाय कोणताही निर्णय आपण घेऊ शकत नाही.एखादा निर्णय घेत असताना त्यावर होणारे फायदे नुकसान , वाईट आणि चांगले परिणाम या सगळ्या गोष्टींवर आपण आधी चर्चा करतो कोणाची तरी मदत घेऊन मग आपण काय करायचे तो निर्णय घेतो.विचार न करता एखादा निर्णय घेतला तर त्याचे होणारे दुष्परिणाम हे आपल्यालाच सहन करावे लागतात .जी काही आपण चर्चा करत असतो त्यातून काहीतरी निष्पन्न होईल अशा पद्धतीची चर्चा करण्यात आपण वेळ घालवावा.उगाचच वायफळ चर्चेमध्ये आपण आपल्या वेळ वाया घालवू नये.

कुठेही बोलताना आधी आपल्याला मनात विचार करून च सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात.परंतु आपण विचार नं करता जर बोलत सुटलो तर कदाचित आपले बोलणे चुकीचे असेल तर समोरचा माणसांच्या भावना आपल्याकडून दुखावल्या जाऊ शकत त्यामुळे कुठल्याही गोष्टीची आधी तयारी असल्याशिवाय जास्त प्रमाणात कोणत्याही गोष्टीत पुढाकार घेऊ नये.

आपली कामानिमित्त मीटिंग जरी असली तरी आपल्याला काय बोलायचे ,शिवाय कोणत्या विषयावर आपले प्रेसेंटेशन आहे त्याची तयारी आपल्याला आधीपासून करावी लागते.शिवाय आधीपासून तिथे काम करत असलेल्या लोकांसोबत चर्चा तर केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे चर्चा म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय करायचे आहे याचा थोडक्यात एक आढावा घेणे आणि जसे ठरवले आहे त्या प्रमाणे पुढे जाणे.

कधी कधी जे काही होऊन गेलेले असते त्यावर चर्चा करून काही उपयोग नसतो. पण काही लोकांना अशी सवय असते की ते उपयोग नसलेल्या गोष्टींवर चर्चा करत बसलेले असतात. अशा चर्चेमुळे आपण आपला वेळ घालवून त्यातून निष्पन्न तर काही होणार नसते.त्यामुळे आपल्याला जर अशी सवय असेल तर ती कशी सवय मोडता येईल हे बघणे गरजेचे आहे.

चर्चा करून आपला त्या चर्चे मध्ये फायदा काय आहे ते बघणे गरजेचे आहे.

काही वेळेस नात्यामध्ये चर्चा करूनच आपल्याला निर्णय घ्यावे लागतात.नात्यामध्ये जर भांडण होतं असतील तर त्यावर आपण काहीतरी ठरवून निर्णय घेत असतो. जेव्हा भांडण होतं असतात तेव्हा जर दोघेही चुकीच्या पद्धतीने बोलत असतील तर अर्थातच भांडणे होणार. तेच त्यात एकाने जर समजूतदारपणा दाखवला तर भांडण हे जास्त होणार नाही. नात्यामध्ये असताना सतत आपण च बरोबर  आहोत हे सिद्ध करणे थांबवावे.आपले जसे कोणत्याही गोष्टीवर मत असते तसेच वेगळे मत हे दुसऱ्याचे सुद्धा असते याचा विसर आपल्याला पडता कामा नये.

काही वेळेस आपल्या मनातले इतरांसोबत सांगायला आपण संकोच करत असतो. मग हा संकोच आपल्याला का वाटत असतो ? कारण आपण जर आपल्या मनातले कोणाला सांगितले तर आपल्याला कोणीतरी हसेल किंवा आपल्या विचारांची कोणीतरी कदर केली नाही तर या गोष्टीची आपल्याला भीती वाटत असते.आपले विचार हे समोरच्याने समजून घेतले नाही आणि आपल्या मनातली जी गोष्ट इतरांना कळून नसेल द्यायची , ती गोष्ट समजा आपण कोणाला सांगितली तर तो ती गोष्ट कोणाला तरी सांगेन याची मनात भीती असणे.त्यामुळे आपण आपल्या मनातले कोणाला सांगताना आपल्याला पाहिजे तसा खात्रीशीर आणि विश्वासू माणूस आपल्याला न भेटल्यामुळे काही वेळेस मनातले विचार मनात च राहतात .त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टी चा निर्णय घेण्याआधी जवळच्या माणसांसोबत चर्चा करून निर्णय घेतला तर नंतर होणारे नुकसान हे कदाचित कमी प्रमाणात होऊ शकते.

एखाद्या गोष्टीबाबत चर्चा करत असताना त्या विषयासंबंधी आपल्याला सखोल ज्ञान असले पाहिजे.आपल्या डोक्यात  काही कल्पना आहे त्या प्रत्यक्षात कशा अमलात आणता येतील त्या बरोबरच आपली माहिती आणि दुसऱ्याची माहिती ही एकमेकांना गेली अजून काही नवीन कल्पना बाहेर येऊ शकतात. तुम्हाला त्या गोष्टीत बद्दल किती अभ्यास आहे हे समोरची लोक निरीक्षण करत असतात. एखाद्या गोष्टीत उतरून त्या गोष्टी मध्ये तुम्ही अजून किती ज्ञान मिळवू शकतात हेच त्यातुन स्पष्ट होतं असते. कोणत्याही गोष्टीची चर्चा करत असताना तुमचे सवांद कौशल्य हे सुधारण असते.तुमची बोलण्याची भाषा ही अजून दुपटीने चांगली होत असते. चार लोकांमध्ये आपला निर्णय सांगण्याचा आत्मविश्वास आपल्यात आपोआप निर्माण होत असतो.एखाद्या ग्रुप मध्ये एखादा निर्णय घेण्याआधी चर्चा केली तर त्या निर्णयापर्यंत आपण पोहोचू शकतो.ग्रुप मध्ये चर्चा करत असताना आपल्याला दुसऱ्याचे विचार आणि दुसऱ्याचे ज्ञान आपल्या पर्यंत पोहोचत असतात . तुम्ही चर्चा करत असताना तेव्हाच बोलू शकता तेव्हा तुम्हाला त्या विषयाशी चार गोष्टी माहित असतात. जसे आपले बोलणे ऐकून घेतले पाहिजे तसेच समोरचा काय म्हणतोय हे ऐकण्याची सुद्धा आपली तयारी पाहिजे .

एखादी गोष्ट होऊन गेली असेल आणि ती गोष्ट चर्चा करून बदलणारी नसेल तर त्या विषयावर चर्चा करून काहीही उपयोग नसतो. त्यात आपला काही दोष नसला किंवा असला तरी त्यावर सारखं बोलून बोलून आपण त्या गोष्टीत मध्ये अडकून राहत असतो.परिणामी आपण आपला वेळ वाया घालवत असतो.

 

पुजा काळेल.

Leave a Comment

Your email address will not be published.