दिसामाजी लिहीत जावे, मनातले विचार जोपासावे.

दिसामाजी लिहीत जावे, मनातले विचार जोपासावे. डायरी 2022 प्रतिलिपीवर लिहीत असताना मला अतिशय आनंद होत आहे.
आपली डायरी ही स्वतःसाठी असते. त्या डायरी मध्ये आपण पुढे काय करणार आहोत,भविष्यात आपण कोणत्या गोष्टी ठरवल्या आहेत, डायरी मध्ये अतिशय मनातले खोल विचार जे कोणाला सांगू शकत नाही ते आपण आपल्या डायरी मध्ये लिहून ठेवतो.डायरी 2022 लिहीत असताना आयुष्यात आता काय करणार आहोत किंवा आपल्या मनातले विचार काय आहे हे आपण या डायरी मध्ये लिहून आपले मन मोकळे करू शकतो.

दिसामाजी लिहीत जावे, मनातले विचार जोपासावे.

 

डायरी 2022 प्रतिलिपीवर लिहीत असताना मला अतिशय आनंद होत आहे.
आपली डायरी ही स्वतःसाठी असते. त्या डायरी मध्ये आपण पुढे काय करणार आहोत,भविष्यात आपण कोणत्या गोष्टी ठरवल्या आहेत, डायरी मध्ये अतिशय मनातले खोल विचार जे कोणाला सांगू शकत नाही ते आपण आपल्या डायरी मध्ये लिहून ठेवतो.डायरी 2022 लिहीत असताना आयुष्यात आता काय करणार आहोत किंवा आपल्या मनातले विचार काय आहे हे आपण या डायरी मध्ये लिहून आपले मन मोकळे करू शकतो.

डायरी मध्ये थोडेसे मनातले लिहीत असताना.

दिवस असे जात असताना अचानक आयुष्यात काही नसल्यासारखे वाटत असते तेव्हा मग स्वतःला सतत सकारात्मक कसे ठेवता येईल याचा विचार करत असताना सतत काहीतरी मनाला सकारात्मक कसे ठेवता येईल याचा विचार करणे. स्वतःला सतत चांगल्या विचारात कसे  राहता येईल हे बघणे चांगले पुस्तके वाचून मन शांत ठेवणे .दुसऱ्यांचे विचार ऐकून घेणे आणि ते स्वतःला पटतात का हे बघण्यात आपण वेळ घालवावा.

जर विचार पटले नाही तर पटकन तिथल्या तिथे बोलून मोकळी होणारी मी आहे. आपले मत हे दुसऱ्यांना समजलेच पाहिजे. आपले विचार हे केवळ आपल्या पुरते मर्यदित न ठेवता ते चार चौघात सांगून त्या विचारांना चालना ही भेटलीच पाहिजे.

स्वतःच स्वतः ला समजून घेणारे आपण बनलो पाहिजे.आपल्या वेळ असेल तेव्हा खरी मदत करणारे लोक आपल्या मदतीला येतीलच हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक परिस्थिती वर आपण कशा प्रकारे मात करणार आहोत आणि आपल्यात किती क्षमता आहे हे सुद्धा परिस्थिती दुसऱ्यांना दाखवून देत असते.त्यामुळे आपण परिस्थिती कशी हाताळतो हे खुप गरजेचे असते.

डायरी 2022 ह्या वर्षात नवीन काहीतरी करून स्वतःची ओळख कशी होईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

आरोग्य ,आर्थिक ,शैक्षणिक,रोजगारी या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त कशा भेटीला यासाठी आपण तत्पर पाहिजे.

2022 मध्ये आपल्या नवीन ओळखी अजून कशा चांगल्या पद्धतीने वाढवता येतील यावर भर दयावा. नवीन ओळखी ,नवीन माणसे जोडण्याचा माझा एकाच हेतू असतो की जेवढी नवीन माणसे आपण आपल्या आयुष्यात आणत असतो ती सगळी माणसे विविध क्षेत्रात कार्यरत असतात आणि त्यांचे अनेक अनुभव त्यांचे अनेक विचार जे आपण कधीच ऐकलेले नसतात ते आपल्याला ऐकायला भेटत असतात. त्यांच्या क्षेत्रातले थोडेफार ज्ञान ते आपल्याला बोलण्याच्या माध्यमातून देत असतात यामुळे आपल्या ओळखी या दरवर्षी वाढल्याच पाहिजे.

नवीन ओळखी करत असताना आपली माणसे त्यांच्या सहवासात राहून त्यांचे आयुष्यातले अनुभव आपल्याला उपयोगी येत असतात.

चांगली माणसे आणि चांगली पुस्तके ही आपल्याला आयुष्यात कधीही एकटे सोडत नाहीत. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा या दोनच गोष्टी उपयोगी येत असतात.तेव्हा या गोष्टींपासून तुम्ही स्वतः कधी दूर जाऊ नका.

रोज आपल्याला लिहून ठेवायची सवय नसते. लिहून ठेवायचे म्हणजे दिवसभर आपण काय केले आणि आपल्या सोबत काय घटना घडतात हे लिहून ठेवायचे हे फक्त आपण आपल्यासाठी करत असतो.दिवसभरात घडलेल्या गमतीजमती किंवा बाहेर काहीतरी खरेदी करत असताना आपल्याला फसवले गेलेलो असतो आणि तो विनोदी किस्सा असतो तो सुद्धा अगदी जसा घडला तसा लिहून ठेवला की जेव्हा केव्हा आपण डायरी वाचू तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक आनंदाच हसू येईल. आनंद किंवा समाधान हे असच आपल्या छोट्या छोट्या गोष्टीत असतो फक्त तो आपण तो स्वतः शोधायचा असतो तरच तो आपण अनुभवू शकतो. आपल्याला कोणत्या गोष्टीत आनंद भेटतो त्या गोष्टी स्वतः करत राहणे गरजेचे आहे.

आपण काहीतरी चांगले लिहून ठेवले तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा तो एक मार्ग आहे . जर आपण मन मोकळेपणाने कोणासोबत बोलू शकत नाही तर लिहण्याचा एक अतिशय चांगला मार्ग आहे. काही जणांना सगळ्या गोष्टी पटकन जवळच्या माणसांना सुद्धा सांगू शकत नाही.मग त्या वेळी लिहून स्वतः चे मन मोकळे करू शकतात. आपले कोणी ऐकून घेणारे नसेल तर लिहून स्वतःला विचारांमधून मोकळे करा.

आयुष्यात आपण अनेकदा चुकत असतो. चुका करत असताना आपण अनेक नवीन गोष्टी शिकत असतो. चुका आपले भविष्य घडवत असतात. पण परत परत ती चूक आपण करत असू तर ती चूक नसून आपले अधिक नुकसान आपण करत असतो. एकदा ती चूक केल्यानंतर त्यातून खुप सारे चित्र विचित्र अनुभव घेऊन पुढे जाणे. चुका या सगळ्यांकडून होत असतात. म्हणून आपण चुकीचे आहोत असे अजिबात नसते. चुका होतात म्हणून आपण नवीन काहीतरी शिकत असतो. आपण चुकलो की का चुकलो हे अधिक महत्वाचे असते. त्यामुळे चुका झाल्या नंतर त्याची कारणे शोधून काढणे महत्वाचे आहे.

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. परंतु काही वेळेस आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी आपल्याला समाजात पटवून घ्यायला लागतात.
उदा. मला रस्त्यावर थुंकणाऱ्या लोकांचा प्रचंड राग आहे.पण हीच लोक मला रस्त्यावर असताना अगदी पावलोपावली दिसत असतात. अशी कृती करत असताना मनात प्रचंड राग असतो. आपण आपल्या घरातल्या माणसांना या वाईट गोष्टींपासून अडवू शकतो परंतु बाहेरच्या किती लोकांना आपण सांगणार की असे करू नका ? असे असंख्य लोक आहेत. प्रत्येकाला दिसणाऱ्या
माणसाला आपण हे सांगत बसायचे का ? हे सामाजिक भान मुळातच प्रत्येकाच्या घरातून निर्माण झाले तर हे प्रमाण कमी होईल. त्यासोबतच आपण रस्त्यावर थुंकत असताना त्याचे परिणाम काय असतात, आपण स्वतः बरोबर दुसऱ्या चार जणांचे आरोग्य धोक्यात घालत असतो हे सांगणारे लोक त्यांना पाहिजे . ही जनजागृती जर आपण खुप जास्त वाढवली तर तेवढे प्रमाण कमी होईल आणि या गोष्टी मधून आपण सगळेच मुक्त होऊ.

आपल्या घरात जर अशी सतत बाहेर थुंकणारी व्यक्ती असेल तर तिला जर तुम्ही घरातूनच जर त्या गोष्टींमधून अडवले तर ती एक व्यक्ती समाजामध्ये थुंकत असताना एक व्यक्ती आणि अशा अनेक घरांमधून अडवले तर हजारो व्यक्ती आणि त्या नंतर कायम स्वरूपी हे संकाटातुन आपण मुक्त होऊ. त्यामुळे बाहेर वावरत असताना ज्या आपण समस्या बघत असतो त्या आपल्या घरातूनच निर्माण होतं असतील तर त्या समस्या आधी घरापासूनच थांबल्या तर या जास्त प्रमाणात होणार नाही.

आपण दिवसभरात खुप ठिकाणी वावरत असताना अनेक लोक आपल्याला भेटत असतात.मग असे थुंकणारे कृत्य आपली जवळची लोक असतील तर त्यांना आपण समजून सांगून अडवू शकतो. यामुळे प्रत्येक गोष्टी मध्ये आपण कशा आणि किती प्रकारे आपण आपली मदत करू शकतो हे बघावे जेणेकरून खरंच काहीतरी चांगले काम केल्याच समाधान आपल्याला भेटेल.

त्याचबरोबर बाहेर घरातला कचरा फेकत असताना लोक जरासुद्धा विचार करत नाही. घरातला कचरा बाहेर रस्त्यावर टाकत असताना आपण या समाजात राहत असताना आपण स्वतःच किती कचरा करत असतो हे लक्षातच येत नाही आपल्या? किती गोष्टी दुसऱ्या लोकांनी आपल्याला सांगितल्या पाहिजे.? चांगल्या गोष्टी स्वतःच स्वतःला समजल्या पाहिजे.

आपण स्वतः आणि घरातून चांगल्या गोष्टी आपण शिकत असतो तशाच गोष्टी समाजात वावरत असताना काही गोष्टींचे नियम आपण स्वतः पाळून समजासाठी काहीतरी केल्याच समाधान आपण आनंदाने घेऊ शकतो.

खुप गोष्टी आपल्याला पटत नसतात पण अनेकदा आपल्या पटत नसल्या तरी आपल्याला त्या गोष्टीनां आपल्याला सामोरे जावे लागत असते. रस्त्यावरून जात असताना अशा काही विचित्र गोष्टींमुळे आपले आरोग्य हे खरंच धोक्याचे आहे.

नवीन वर्षामध्ये आपण स्वतःचे आयुष्य जगत असताना स्वतःसाठी काहीतरी संकल्प करत असतो तसेच या समाजात राहत असताना समाजासाठी मी काहीतरी करेन हा संकल्प सुद्धा त्या सोबत केला पाहिजे. संकल्प हा केवळ संकल्प न राहता तो कृती मध्ये उतरवला तर त्याचा फायदा हा आपल्यालाच होणार आहे.

डायरी म्हणजे हे स्वतः च्या मनातले विचार आणि मनात घडणाऱ्या गोष्टी असतात.तुम्ही स्वतःसाठी तुमच्या दैनंदिन विषयी लिहून ठेवत जा.आणि मन मोकळे करत जा.

नवीन वर्ष नवीन गोष्टी करण्यात घालवून अनेक नवीन गोष्टी अनेक नवीन विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.

पुजा काळेल.

Leave a Comment

Your email address will not be published.