द्वेषाची एक ठिणगी पुरेशी होती.

द्वेषाची एक ठिणगी पुरेशी होती. द्वेषाची एक ठिणगी पुरेशी होती.
पेटलेल्या रानात करुणेला ही जागा नव्हती.

द्वेषाची एक ठिणगी पुरेशी होती.

आपल्या सगळ्यांना कोणाचा तरी मनातून राग येत असतो.आणि राग हा माणसाला हलवून टाकणारा असतो.जेव्हा तो रागात असतो तेव्हा तो चिडलेला असताना तो राग खरं खरं असेल तर तो त्याच्या मनातल सगळे बाहेर व्यक्त होत असतो.राग हा माणसाला मन मोकळे करण्याचा एक मार्ग असतो. रागामध्ये माणूस समोरच्याला जेव्हा बोलत असतो तेव्हा त्या गोष्टी खऱ्या असतात. रागामुळे माणूस कधी कधी नाती तोडतो ,किंवा जवळच्या माणसाला दूर करत असतो.

जसा आपल्याला कोणीतरी आवडत नाही किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला आवडत नाही किंवा ती व्यक्ती समोर आली तरी त्या माणसाचा आपण द्वेष करत असतो अशा भावना आपल्या मनात का येत असतात.?
याला आपला स्वभाव विचित्र आहे असे म्हणता येईल का? तर आपण किंवा आपला स्वभाव याला कारणीभूत नाही तर आपल्या समोर येणारी परिस्थिती मुळे आपल्या स्वभावात तसा बदल झालेला असतो. ती न आवडणारी व्यक्ती त्याने तुमच्या आयुष्यात आधी काहीतरी केल असेल किंवा तुमच्याकडून काही चूक झाली यामुळे समोरचा माणूस तसा तुमच्या बरोबर वागत असेल याला जसा तो जबाबदार असतो तेवढ्याच प्रमाणात आपण सुद्धा जबाबदार असतो.

जसे आपल्याला कोणी आवडत नसते तसेच आपला सुद्धा द्वेष करणारे खुप असतात.मग हा द्वेष का ते करतात? हा द्वेष जर कारण नसताना आणि अनोळखी माणूस करणारा जर असेल तर त्याचा आपल्या आयुष्यात  काहीही फरक पडला नाही तरी चालेल.परंतु जर द्वेष करणारी व्यक्ती कारण असताना आपला द्वेष करत असेल आणि ती व्यक्ती जवळची असेल तर आपल्याला फरक हा पडणारच.

द्वेष करणाऱ्या व्यक्ती सोबतच आपले दैनंदिन असेल तर त्या व्यक्तीसोबत आपण कसे वागायचे हा मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. तो माणूस आपल्याला सतत दिसणारा असतो,वेळोवेळी कामानिमित्त त्याच्यासोबत भेटी या होत असतात. त्यामुळे आपला काही राग असेल तो आपल्याला बाजूला च ठेवावा लागतो.तरच त्या माणसाबरोबर आपण कामे नीट करू शकतो.अशा वेळी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पुढे जावेच लागते.

काही वेळेस आपण कळत नकळत खोटे बोलत असलो आणि समोरच्याला नंतर समजले तर तो आपला द्वेष हा साहजिकच करणार.

जेव्हा आपल्याला राग अनावर होतो तेव्हा आपण कोणाला काय बोलतोय हे सुद्धा आपल्याला समजत नाही .रागामध्ये आपण खुप गोष्टी बोलून जातो.रागामध्ये बोलताना आपले शब्द हे जर वाईट असतील तर ते शब्द आपल्याला परत मागे घेता येत नाहीत.

काही काही माणसे सतत राग व्यक्त करत असतात.काही जण सगळा राग एकदम काढतात प्रत्येकाची राग व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असतात. राग ही अशी गोष्ट आहे की त्याने आपले मन मोकळे होते आपल्या मनात कोणत्या गोष्टीचा किती प्रमाणात राग आहे या गोष्टी समोरच्याला समजत असतात पण हाच राग आपण जर योग्य पद्धतीने आपण व्यक्त केला तर कदाचित आपण आपली जवळची माणसे दुखावणार नाही.
मग राग व्यक्त करताना शांत राहून च व्यक्त केला पाहिजे असे आहे का तर असे बिल्कुल नाही. राग हा शांत पद्धतीने कोणाला व्यक्त करता येतो परंतु कोणाला शांत पद्धतीने राग व्यक्त करता येत नाही त्यामुळे प्रत्येकाचा राग व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते.

दुसरा आपल्या सोबत कसा वागतो हा अंहकार ठेवून त्याचा आपण द्वेष जर कायम मनात ठेवला तर त्याचा त्रास आपल्याला होणार. आपल्याला जसे समोरचे चुका झाल्यावर माफ करतात तसे आपण सुद्धा कोणाची चूक झाली तर त्यांना माफ करायला शिकले पाहिजे.

आपण जेवढ्या अपेक्षा दुसऱ्यांकडून करत असतो त्याच प्रमाणात आपल्याकडून कोणाच्या तरी अपेक्षा असतात हे कायम आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याकडून कोणाच्या काही भावना दुखावल्या जाणार असे आपण वागता कामा नये.जर चूक आपली असेल तर माफी मागायची सुद्धा आपली तयारी पाहिजे.

आता हल्लीच्या तरुण पिढीला जर त्यांच्या मनासारखे झाले नाही तर त्यांना राग हा पटकन येतो आणि ते पटकन बोलून मोकळे होतात.तरुण पिढी ही सध्या नोकरी नसल्यामुळे किंवा आयुष्याला योग्य दिशा न भेटल्या मुळे तरुण पिढी इतकी काळजीत असते की त्यामुळे त्यांचा स्वभावच चिडचिडे पणा झाला आहे त्यांना समजून घेणारे त्यांना त्यांची माणसे त्यांच्या आयुष्यात पाहिजे.
द्वेष हा आपल्याला व्यक्त होण्यासाठी जसा चांगला आहे तसाच तो आपल्या आरोग्यासाठी घातक सुद्धा असतो.कधी द्वेष आपल्याला मानसिक आजाराला बळी सुद्धा पाडू शकतात.त्यामुळे किती द्वेष व्यक्त करायचा हे आपल्यावर असते.
राग व्यक्त करून झाल्यानंतर शांत होऊन झालेल्या रागाचा विचार करून त्या गोष्टी बदलणे आपल्या हातात आहे.राग हा जास्त नुकसान न होणारा असावा राग व्यक्त करून झाल्यानंतर ज्या कोणावर राग आपण काढला आहे त्याची माफी मागून त्या माणसाला परत शांत करावे.

कोणाचा जास्त राग किंवा द्वेष मनात न ठेवता आपले आयुष्यात सुखी राहा.कोणामध्ये जास्त अडकून न राहता आपले आयुष्यात आपल्याला अजून काय छान करता येईल याचा विचार करावा. दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालू आहे हे बघण्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय करायचे याचा विचार करावा.

द्वेष हा काही वेळेस छोटे छोटे कारणे असू शकतात.

पुजा काळेल

Leave a Comment

Your email address will not be published.