खुप काही मनात दाटले आहे

खुप काही मनात दाटले आहे.
पण आता हायसे वाटले आहे.
आयुष्यात खुप गोष्टी आपल्या मनात दाटून राहत असतात. त्या जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला हायसे वाटत नाही.
मनात विचारांचा गोंधळ असताना आपले मन कुठेच रमत नाही. जोपर्यंत आपण शांत नसतो तोपर्यंत आपले मन स्थिर नसते. मन हे खुप चंचल असते. कधी कधी नको ते विचार मनात येत असतात .हेच विचार आपल्याला सतत त्रास देत राहतात .

खुप काही मनात दाटले आहे.

 

खूप काही मनात दाटले आहे.

जोपर्यंत आपण ते कोणाला सांगत नाही तोपर्यंत आपल्याला हायसे वाटणार नाही. विचार हे कधीच न थांबणारे आहेत. विचार हे सतत आपला पाठलाग करणारे असतात . त्यामुळे आपण आपल्याला विचारांवर कशी मात करायची त्याच्यावर कसा ताबा ठेवायचा हे बघावे. मनात असंख्य गोष्टी असतात . कुठल्या गोष्टी कोणाला सांगायच्या हे सुद्धा आपल्याला समजले पाहिजे. जर समोरची ची व्यक्ती आपले मनापासून ऐकत नसेल तर उगाचच त्याला सांगत बसणे म्हणजे आपला अमूल्य वेळ घालवण्यासारखे आहे.
सकारात्मक विचार आपल्याकडे असतील तर तेवढे आपण फ्रेश असतो .तेव्हा आपल्याला आपल्या आजूबाजूच वातावरण पण आपल्याला ऊर्जा देणारे ,आणि सकारात्मक वाटत असते . काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा भेटत असती. त्यामुळे आपल्या आजूबाजूला नेहमी आपण स्वतः सकारात्मक वातावरण ठेवावे.जिथे आपले मन शांत राहील.
आपल्याला जिथे शांतता भेटेल तिकडे जाऊन आपण आपले मन रममाण करावे.उगाच नकारात्मक वातावरणात राहून आपले मन अस्थिर करू नये.
कधीकधी आपले मन नको त्या आठवणी मध्ये गुंतून राहते.आठवणी मधून बाहेर पडलो तरी त्या मध्ये जर पुन्हा अडकलो तर परत आपल्यालाच त्रास होईल .चांगल्या आठवणी असेल तर मन तेवढच छान आणि प्रसन्न होतं असते. परंतु तेच विचार वाईट असतील तर ते आपले मन हलवून टाकते.
आपणच आपल्या मनाची काळजी घेऊ शकतो.आपल्याला मनाची काळजी दुसरे कोणी घेऊ शकत नाही.सगळी कामे करत असताना आपल्याला आपल्या मनाची काळजी घेणे हे सुद्धा एक प्रकारे कामच आहे ते रोज करणे हे आपल्यासाठी गरजेचे आहे.जोपर्यंत आपण शांत आहोत तोपर्यंत आपले मन शांत आहे. एकदा मन अस्थिर झाले की आपले कशातच लक्ष लागत नाही. सगळेच संपून गेल्यासारखं वाटत असते.आणि मग आपण मानसिक आजारांकडे खेचलो जातो.
मनात विचारांचं चक्र चालू असेल तर पहिले ते शांत करणे हे आपल काम आहे. मनात येणारे विचार आपण त्यांना कधीच अडवू शकत नाही.जेव्हा आपण आपल्या मनातलं योग्य व्यक्तीला सांगून आपले मन मोकळे करतो तेव्हाच आपले मन हायसे होते. जोपर्यंत मनातल्या गोष्टी मनात राहतात त्या बाहेर आणायला आपण स्वतः प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला छान आणि शांत वाटणार नाही.
मनापासून कोणाला तरी आपण नक्की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आपल्या माणसाला विचाराव की काही असेल तर सांग, मनात काही गोंधळ असेल तर तो बोलून दाखव असं नक्की विचारत राहावं.असं केल्याने कदाचित आपण एक माणुसकी म्हणून कोणाला तरी मदत केल्याचं समाधान आपल्याला भेटेल. अशी मदत केल्याने आपण एक सामाजिक कार्य केल्याचं सुख आपल्याला भेटेल . कोणी आपल्याला काळजीत दिसत असेल तर त्याला तत्परतेने मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.कोणाला तरी समजून घेणे ही आपली त्याच्याबद्दलची आपली काळजी आहे. कोणी मानसिक समस्येमधून जात असेल तर त्याला आधार देणे ही आपली जबाबदारी आहे. कोणाला आर्थिक मदत ,कोणाला आधार देणे हे एक माणुसकीला धरून वागणे.
जे शांत असतात त्यांना बोलके करून त्यांच्या मनात काय चालू आहे हे समजून घेण्याची कला आपल्यात असणे हे गरजेचे आहे.
जर आपण आपल्या मनाला ओळखत गेलो तर आपण समोरच्या च्या मनात काय चालू आहे हे ओळखू शकतो.
जसे आपल्याला वाटत, की आपल्याला सतत कोणीतरी विचारात राहवे की काय झाले आह? तसेच समोरच्या सुद्धा मनात तेच असते.
आपण जेव्हा दुसऱयाच्या मनाचा विचार करतो तेव्हा च समोरचा आपल्या मनाचा विचार करत असतो. जेवढे आपण दुसऱ्याच चांगले करू, जितकी आपण दुसऱयाला मनापासून प्रेमाने मदत करू ,तितकीच मदत करणारी लोक आपल्याला भेटत असतात.
आपण चांगले काम केले की आपल्यासाठी पुढ खरंच काहीतरी चांगले घडत असते. पण आपण जर काही वाईट केले की तेवढेच आपले सुद्धा वाईट होत असते.
चांगले काम करून आपला चांगला वेळ चांगल्या ठिकाणी सत्कारणी लावावा.
चांगल्या गोष्टी जितक्या करू त्या गोष्टी उगाच कोणाला तरी मोठेपणा म्हणून सांगत बसणे हेसुद्धा चुकिचे आहे.
आपण केलेल्या चांगल्या गोष्टी केल्यावर शक्यतो मोठेपणा म्हणून कोणाला न सांगणे हेच योग्य आहे.
आपले कौतुक आपण स्वतः स्वतःसाठी केलेच पाहिजे.परंतु आपले कौतुक आपण स्वतः चारचौघात सांगत बसणे हे बरोबर नाही. आपले कौतुक हे समोरच्या लोकांनी स्वतः केले पाहिजे. तर ते काम सार्थकी झाल्यासारख होईल.
चांगल्या गोष्टींचं कौतुक हे नेहमी होतं असते.परंतु आपण एक जरी चूक केली तर याच समजात बोलणारी असंख्य लोक आहेत.त्यामुळे चुका जरी झाल्या तरी त्या सुधारण्यासाठी काय करायचं ते बघणे आपले काम आहे.
चूक ही चूक असते . परंतु ती चूक आपल्याला समजत नाही कदाचित खुप वेळ निघून गेल्यानंतर ती चूक आपल्याला समजते.परंतु वेळ निघून गेलेली असती ती चूक कितीही आपण रडलो तरी ती चूक न भरून येणारी असती.आपण त्यासाठी कितीही रडलो तरी ती वेळ परत येणार नसते. त्यामुळे अशा गोष्टीनमध्ये जास्त अडकलो तर त्यातून बाहेर येणे खुप अवघड असते. चुक झाली की खुप लोक बोलणारी असतात. त्यामुळे जास्त लक्ष न देता आपण आपला वेळ चूक का झाली ? हे बघावे.
मनातल्या गोष्टी बाहेर आणणे हे जमत नसेल तर त्या बाहेर कशा काढता येतील ते बघावे.कारण ते जर जमले नाही तर आपल्याला खुप त्रास होईल . एखादे पुस्तकं वाचून आपले मन शांत ठेवावे.
आपण आपल्या स्वतःच मन जपताना दुसऱ्याच सुद्धा मन कसे आनंदी राहील याचा विचार करावा आणि आयुष्यात आनंदी राहून स्वतः ला खुप खुश ठेवावे.

पुजा काळेल.

Follow My Facebook Page  Facebook 

 

Leave a Comment

Your email address will not be published.