पर्वा न करता जगता आले तर

पर्वा न करता जगता आले तर

 

आयुष्यात सतत हे केल्याने काय होईल ते केल्याने काय होईल अशी सतत आपण पर्वा करत आयुष्य आपण जगात असतो.कधी कधी त्यामुळे सारखं असा विचार करत आयुष्य जगलो तर नक्कीच ताणतणावला सामोरे जावे लागेल.चांगल्या गोष्टीची सुरवात पर्वा न करता जर केली तर  ती कितीतरी पटीने चांगली होऊ शकते.पण ती सुरवात करण्याआधीच हे असे केले तर काय होईल,मला कोण काय बोलेल हा विचार करण्यापेक्षा आपण जे काही करतो ते बरोबर आहे का,किंवा जे काही करतोय त्याचे चांगले वाईट परिणाम काय असतील याचा विचार  करण्यात वेळ घालवावा.जे काही करणार आहोत त्याचे आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही परिणाम बघायला लागणारच आहेत.त्या दोन्ही गोष्टी घेऊन आपले काम अधिक कसे छान होईल यावर विचार करावा.
जास्त विचार म्हणजे पर्वा न करता जगणे म्हणजेच आयुष्य  सुखी झाल्यासारखं होईल. सतत आपण हे केल्याने असं होईल तसे होईल अशी पर्वा करत जगत राहिलो तर मात्र आपण आपले आयुष्यात कदाचित सुखी राहू शकणार नाही .

पर्वा न करता जगता आले तर
 

पर्वा ही नेहमी स्वतःची करावी तर च आपल्याला त्याचा उपयोग आहे. दुसऱ्याची पर्वा केल्याने फायदा त्याला जास्त होणार आहे का? दुसऱ्याचा विचार केला की स्वतः च्या आयुष्याचे नुकसान होतं असते.सगळे जण नेहमी स्वतःचा फायदा बघत असतात.मग आपण कशासाठी समोरच्याला आपल्याबद्ल काय वाटत किंवा आपण वागतो ते बरोबर आहे की नाही हे ठरवणारे ही आपल्या आजूबाजूची लोक असतात.आणि काही वेळेस आपण आपल्या मतापेक्षा दुसरे काय म्हणतात त्याला महत्व देत असतो.आणि आयुष्यातला निम्मा वेळ आपण त्यात घालवत असतो.आपण जर आपल्या मताला किंमत दिली नाही तर दुसरे लोक आपल्या मतांचा का आदर करतील.
पर्वा करत आयुष्य जगत बसलो तर आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. नेहमी आपण काय करतो ते आपण स्वतः ठरवायचे की ते चूक आहे की बरोबर? चूक असेल तर ते केल्याने काय वाईट परिणाम होतील हे सुद्धा अनुभव घेणे ही सुद्धा एक शिकवणच आहे.
सगळ्यांनाच असं वाटत असते की आपण जे काही करतो ते आपण बरोबर च वागत असतो परंतु आपल्याला आपल्या चुका या कधीच दिसत नाही दिसल्या तरी आपण कसे बरोबर आहोत हे आपण समोरच्याला सतत पटवून देत असतो कारण त्या वेळी आपण खरंच चुकीचे असतो परंतु आपले मन ते मानायला तयार नसते किंवा कदाचित ती चूक मान्य करायला दुसऱ्यासमोर आपला कमीपणा दिसेल या भीतीने आपण चुकीचा निर्णय घेतलेला असतो त्या वेळी ते समजत नाही परंतु एकदा वेळ निघून गेली त्याचा काहीही उपयोग नसतो.
पर्वा ना करता जगणे आणि बेफिकीरने जगणे यात खुप फरक आहे .बेफिकीर म्हणजे मुदाम जाणूनबुजून केलेल्या चुका,खरंच त्या गोष्टीची काळजी नसणे म्हणजेच बेफिकीरने वागणे. आपण आपल्या आरोग्यबाबत बेफिकीर असलो की त्याचा त्रास आपल्या म्हतारपणात हा होणार असतो यातून कोणाची च सुटका नसते. त्यामुळे जर आपण आतापासून च जर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर कदाचित जास्त होणारा त्रास कमी होऊ शकतो. बेफिकीरने आपण जर आपले वाहन चालवत असू तर कधी आपण खाली पडून आपले काय होईन ते सुद्धा आपल्याला पडल्यानंतरच समजते.त्यामुळे बेफिकीरचे आयुष्य हे आपल्याला किती त्रासदायक होऊ शकते हे आपल्याला माहित असते.म्हणून आधीच काळजीने जर वागलो तर आपल्यामुळे घरच्यांना त्रास होणार नाही.
पर्वा म्हणजे सतत स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करत बसणे आणि हा विचार आपल्याला खुप मानसिक त्रास देत असतो त्यामुळे आपण जर दुसऱ्याला आपल्यलाबद्ल काय वाटते हा विचार करणे चुकीचे आहे.
आपण जर खरोखर चुकीचे वागत असलो तर बरोबर सांगणारे लोकांचं ऐकणे हे आपले कर्तव्य आहे.जेव्हा आपण बरोबर असतो तेव्हा लोक कदाचित बरोबर असल्यामुळे ते बोलायचं विसरून जातात.पण हेच आपण चुकीचे असलो की अनेक जण सल्ला न मागता देणारे अचानक लोक आपल्या समोर येतात. चूक किंवा बरोबर हे आपण ठरवून वागत नसतो परिस्तिथीनुसार आपण तसे वागत असतो परिस्थिती आपल्याला विचार करायला भाग पडत असते. आपली निर्णय घेण्याची क्षमता वाईट परिस्थिती ती वाढवत करण्याचं काम करत असतात.
जर वाईट वेळ च नाही तर आपल्याला निर्णय कसे घ्यायचे हे कधीच समजणार नाही. आणि आपली निर्णय घेण्याची क्षमता कदाचित वाढणार नाही.त्यामुळे आपण आपल्यावर आलेल्या परिस्थिती चा सामना कसा करतोय हे आपण त्या परिस्थिती मध्ये कसे वागतो ह्यावर अवलंबून असते.
अभ्यासाची पर्वा करता जगलो तर आपले आयुष्य कुठेतरी सार्थकी लागेल. पण अभ्यासाची पर्वाच जर नसेल तर आपल्याला कुठेच यश भेटणार नाही. आपली परिस्थिती आर्थिक असेल ती आहे तिथेच राहील.ज्या गोष्टीची पर्वा केली पाहिजे त्या गोष्टीची काळजी ही असलीच पाहिजे.नाहीतर आपले भविष्य अंधारात राहील एवढे मात्र नक्की.
आपण आपल्या आयुष्याची पर्वा केलीच पाहिजे.नाहीतर त्याचे होणारे परिणाम आपल्या आयुष्याचे नुकसान करू शकते.आपण वागत असताना त्याचे आपले किंवा आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान होणारे नसावे. पर्वा करत आयुष्य जगण्यापेक्षा खरंच ना घाबरता तसे केले तर काय होईल हे बघणे सुद्धा कदाचित आपल्या फायद्याच असू शकते.त्यातून नवीन गोष्टी आपल्याला शिकायला भेटीतील.
कोणत्याही गोष्टीची सुरवात करत असताना त्याचे फायदे आणि तोटे हे दोन्हीही होणार असते. त्यातले जास्त काय करायचे हे आपण ती गोष्ट कशी करतो यावर अवलंबून असते.सुरवात करत असताना पर्वा केली आपण कि आपल्याला लोका काय बोलतील ,किंवा आपण जे काही काम करतोय त्याला लोक काय म्हणतील हाच विचार करत राहिलो तर आपण आपल्या कामाची सुरवात कधीच होणार नाही. आपण करतो ते काम योग्य असेल तर मुळातच कोण काय म्हणतंय आणि का आपल्याला बोलतील, आणि बोलेले तरी आपल्याकडे तेवढा वेळ सुद्धा पाहीजे ऐकण्यासाठी…
आपला आपल्यावर कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःवर विश्वास असला की कोणतेही काम काम चांगले आणि त्यामध्ये यश भेटत असते.जास्त विचार करण्यापेक्षा कृती करून जे काही करून दाखवा. दुसऱ्यासाठी करण्यापेक्षा कोणतीही गोष्ट स्वतः साठी आधी करा मग ती गोष्ट स्वतः साठी केली असल्याने ती अजून अतिशय सुंदर आणि छान होईल आणि अर्थातच मग आपले कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
पुजा काळेल.

Follow My Facebook Page  Facebook 

 

Leave a Comment

Your email address will not be published.