शब्द सुद्धा अपुरे पडतात

शब्द सुद्धा अपुरे पडतात
मनातल्या गुजगोष्टी मनातच राहतात.

आयुष्यात काही वेळेस आपल्या मनातल्या भावना व्यक्त होण्यासाठी शब्द सुद्धा आपल्याला सुचत नाही. त्यामुळे कसे आणि केव्हा आणि कोणापाशी व्यक्त होयच हेसुद्धा आपल्याला समजत नाही.अशा वेळी मनातल्या गोष्टी या मनातच राहतात आणि मनात विचारांचा काहूर माजतो. मनातल्या मनात आपण स्वतःला खात राहतो आणि मग मानसिक ताण आपल्याला येत असतो . काही जणांना त्यांच्या आयुष्यात बोलून व्यक्त होता येत नाही . त्यांच्या मनात असंख्य विचार असतात . परंतु आपल्याला भावना कशा बोलायच्या ,कोणत्या शब्दात व्यक्त होयच हे च काहींना समजत नाही.

शब्द सुद्धा अपुरे पडतात

 

शब्द सुद्धा अपुरे पडतात

आपल्याला भावना आपण जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत आपले मन शांत होणार नाही.मनात विचारांचा गोंधळ असतो त्यावेळी आपले मन शांत नसते . अस्वस्थ वाटत असते .
काही आपल्याला लिहायचं असेल तर आपल्याला पहिले आपला शब्दसंग्रह पाहिजे त्याशिवाय आपण आपले विचार मांडू च शकत नाही . शब्दांशिवाय आपण बोलणार कसे . शब्दांशिवाय आपण आपल्या भावना कोणाला सांगणार ?
कौतुक करताना आपले शब्द हे इतके मोठे पाहिजे की समोरच्याच कौतुक न करता आपण थकलो नाही पाहिजे. एखाद्या वर प्रेम व्यक्त करताना शब्द च आपली मदत करू शकतात. काही वेळेस प्रेम व्यक्त करताना शब्दांची गरज पडत नाही ते आपल्याला आपल्या जवळच्या माणसांच्या डोळ्यात च दिसून येते.

मनातल्या भावना या मनात जर राहिल्या तर आपण कधीच आनंदी राहू शकत नाही. परिणामी आपण मानसिक ताणाबरोबर जगायला लागू आणि मग त्यातून बाहेर पडणे स्वतःला खुप त्रासदायक होईल. कधी कधी नाही सांगू वाटत मनातल्या गोष्टी कोणाला कारण त्या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्या असतात मग त्या कोणाला पण सांगत बसायचं का?  अशा वेळी ज्या गोष्टी नाही सांगायच्या कोणाला त्या अजिबात सांगू नयेत. परंतु ज्या गोष्टी मनात ठेवून त्रास होतं आहे त्या गोष्टी आपल्याला जवळच्या माणसाला सांगून आपले मन मोकळ कराव.
मनात गोष्टी साठवून ठेवून आपण पुढे आयुष्य तसेच जगत राहिलो तर आपले मन कधीच स्थिर नसेल आणि आपण नुसते पुढे जात राहू. कोणत्याही गोष्टीत अडकून न राहता त्यातून आपण बाहेर कसे पडू हे जास्तीत बघता येईल असा प्रयत्न करावा.
काही जणांना त्यांच्या आजूबाजूला त्यांची विशिष्ट माणसे च त्यांना पाहिजे असतात. त्यांच्या शिवाय ते दुसऱ्या कोणामध्ये सामील होतं नाहीत. यामुळे ते बाहेरच्या जगात  असलेली  नवीन नवीन माणसामध्ये न मिसळून  गेल्यामुळे ते बाहेर नीट वावरू शकत नाही. नवीन व्यक्तीसमोर कसे बोलायचे हे सुद्धा त्या व्यक्तींना समजत नाही .
तरुण असताना मुलांना प्रेमात जेव्हा आनंदी असतात तेव्हा त्यांना प्रेम व्यक्त करायला शब्द नसतात. अगदी ते प्रेमात वेडे असतात की ते त्यांच्याच नादात असतात. आपण सुखी असताना आपल्याला सुख सुद्धा शब्दात मांडता येत नाही आणि दुःख सुद्धा आपल्याला काही वेळेस शब्दात सांगता येत नाही.
तेच जर प्रेमामध्ये निराशा आली तर तो तरुण मुलगा किंवा मुलगी मनातून कोलमडून जाते आणि मग तिला आजूबाजूच्या सगळे जग दुःखी आहे असे वाटू लागते. मग ही मुळे मनातून अस्वस्थ झाले की मग ब्रेकअप झालं म्हणून त्यांच्या भावना इतक्या अनावर होतं असतात की सगळीकडे प्रेमामध्ये असलेली निराशा स्टेटस वरून टाकत असतात. प्रत्येकाच्या भावना व्यक्त होण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात.
मनात ज्या काही गोष्टी असतात त्या शकतो जितक्या बाहेर पडतील हे बघून आपले आयुष्यात सुखकर करावे. आणि सकारात्मक आयुष्य जगणे आणि आनंदी वातावरणात राहणे म्हणजे आपले आयुष्य आणखी छान आणि सरळ होईल.
मनातल्या गोष्टीत जेवढे आपले मन अडकेल तेवढा आपल्याला त्रास होऊन मनातल्या मनात आपण कमजोर होत असतो. जेवढ्या त्या बाहेर येत असतात तेवढे आपण आपले मन मोकळे होतं असते.
आपल्याला आपल्या मनातले जर कोणापाशी किंवा कोणाला सांगता येत नसेल तर त्या व्यक्त करता येण्यासाठी प्रयत्न करावे.मनात गोष्टी साठवून ठेवल्या की कधी ना कधी आपण चिडून रागवून त्या गोष्टी बाहेर येत असतात . आणि आपली सहनशक्ती संपली की त्या गोष्टी सगळ्या आपोआप बाहेर येतात. आणि सगळे मन मोकळे  होते.
जेव्हा आपल्या मनात गोंधळ असतो तेव्हा तेव्हा आपले मन हे शांत नसते आणि अस्वस्थ असते. मनात विचारांचा गोंधळ असेल तर साहजिकच आपले लक्ष हे कुठेच नसते. त्यामुळे आपली चिडचिड होते. आपण आपल्या माणसांवर राग काढत असतो. जोपर्यंत आपले सगळे विचार आपली मते आपल्या मनात काय आणि कसले विचार चालू आहे, आपल्या आजूबाजूलाला सकारात्मक वातावरण आहे की नाही या सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या की आपले मन शांत आणि मनात काहीही नसते.
सांगण्यासाठी शब्द आपल्याला मांडता आले पाहिजे.शब्द अपुरे पडत असतील तर आपल्याला भावना मांडण्यासाठी आपले शब्द हे समोरच्याला समजले पाहिजे .आपल्या मनात विचारांचा गोंधळ असेल तर तो त्याच वेळी ते विचार प्रत्यक्ष शब्दात मांडून आपले मन मोकळे करावे.
मनातल्या गोष्टी मनात च राहिल्या तर एक दिवस आपण मानसिक ताणाला आपल्याला सामोरे जायला लागेल.  आणि त्यातून बाहेर पडणे आपल्यला खुप त्रासदायक होईल. मानसिक त्रास हा खुप जास्त त्रास देणारा असतो.आणि तो आपला त्रास कोणी घेऊ शकत नाही आपला त्रास हा आपल्याला सहन करावा लागतो. त्यामुळे शक्य तितके आनंदी राहून आपले मन जितके मोकळे होईल तेवढे बघणे गरजेचे आहे. आपल्याला मनातल्या गोष्ट जेवढी  आपण आपल्या जवळच्या माणसाला सांगू तेवढे आपण मनातून शांत असतो.खुप काही सांगायचं असेल तरी आपल्याला वाटेल तेवढ्या मोजक्या शब्दात आपले सगळे विचार कसे सांगता येईल हे बघणे गरजेचे आहे.
विचार आपले हे चांगले सकारात्मक असणे गरजेचे आहे. आपल्याला मनात नकारात्मक विचारांचा गोंधळ असेल तर तो कसा थांबवता  येईल हे बघणे गरजेचे आहे.
शब्दात विचार मांडणे मनातल्या गोष्टी आपल्या बाहेर कशा येतील हे बघणे गरजेचे आहे. सगळ्यात जास्त आपल्याला त्या गोष्टी कोणाला सांगायच्या हे सांगणारी योग्य व्यक्ती शोधणे गरजेचे आहे.

पुजा काळेल

https://pgviral.com/wp-admin/post.php?post=14552&action=edit

Follow My Facebook Page  Facebook 

 

Leave a Comment

Your email address will not be published.