शांततेत सुख असते

शांततेत सुख असते

जेव्हा मनात काही नसते तेव्हा शांत बसून राहणे आणि स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे आहे.शांत राहणे म्हणजे काय डोक्यात जे काही विचार चालू असतात त्यातून थोडा वेळ विश्रांती घेणे,थोडा वेळ मनाला सुद्धा विचारांपासून दूर ठेवणे.आयुष्यात सतत आपण आपल्याला मिळणाऱ्या गोष्टीत आपण सुख शोधत असतो.हे सगळे सुख क्षणिक असते.कधीतरी ती गोष्ट संपणारी किंवा तुटणारी असते.याउलट शांततेल सुख किती तरी छान असते.
कधी कधी शांत राहून स्वतःसाठी वेळ देऊन त्यातलं सुख आपल्याला अनुभवता आले पाहिजे.

जेवढे आपण शांत राहायचं ठरवले की कदाचित अजून आपण दुपटीने आपल्या मनात विचारांचं चक्र चालू राहते.असे ठरवून कधीच मनाला शांतता भेटत नाही.
एखाद्या सुनसान रस्त्यावरची भयाण शांतता,देवळातील शांतता,कुठेतरी अनोळखी ठिकाणाची शांतता,काहीतरी मनासारखं नसेल झालं तर ती शांतता,भांडण झाल्यानंतरची शांतता असे किती तरी प्रकार आहेत.आणि यातल्या सगळ्या शांतता आपण आयुष्यात अनुभवतोच.
शांत राहण्यासाठी कुठल्या जागेची गरज नसते जिथे आहोत तिथं बसून सुद्धा आपण शांततेच सुख अनुभवू शकतो.
शांतता आपल्या मनाला जे काही सुख देते ते कदाचित कुठे भेटणार नाही. शांत राहणे म्हणजे आपल्या मनाला शांत करणे ,मनाला थोडासा वेळ देणे , मनाला निवांतपणा देणे या गोष्टी केल्याने आपल्याला खरंच एक प्रकारची शांतता भेटत असते. कदाचित आपले विचार किंवा आपल्या मनात काय चालू आहे हे आपण सगळ्यांना ओरडून सांगू शकत नाही किंवा काही वेळेस जवळच्या माणसाला सुद्धा आपण ते सांगू शकत नाही. तेव्हा आपण शांत बसून आपण ती गोष्ट आठवून कदाचित विसरण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपल्याकडून ते होतं नसते किंवा ती गोष्ट आपल्या मनाला पुन्हा पुन्हा त्रास देण्याचं काम करत असते. अशा वेळेस आपल्याला खरंच आपले मन शांत करून त्या गोष्टीतून बाहेर पडणे गरजेचे असते.पण जर आपण ती गोष्ट विसरलो च नाही तर आपले जगणे अशक्य होईल.
कधी कधी शांत असताना आपल्या मनात चांगले विचार आणायला भाग पाडत असतात. शांत बसणारा माणूस हा नेहमी मोजकेच पण योग्य ते बोलत असतो.तो शांत असतो याचा अर्थ तो बाहेरून शांत असतो पण मनातून तो काहीतरी विचार हा करत असतो तो योग्य वेळेची वाट बघत असतो की आपल्याला बोलण्यासाठी संधी आली की तो बोलतोच. शांत बसणार माणूस हा कधी मनातून हा शांत नसतोच तो काहीतरी सतत चांगले करण्यासाठी प्रयत्न हा करत असतो फक्त तो बोलून दाखवत नाही.
काही वेळेस आपण शांत राहिल्याने प्रश्न सुटत असेल तर शांत राहणे योग्य नाही का? प्रत्येक वेळी आपण बोललोच तर आपण मोठे होणार नाही. शांत बसून प्रश्न सुटणार असेल तर केव्हा पण शांततेला धरून राहिलो तर त्यातून सुख भेटेल.परिस्थिती नाजूक असताना त्यावेळी आपण आपली मते मांडली च पाहिजे हा आपला जर अट्टहास असेल तर ती परिस्थिती अजून सुधारण्यापेक्षा अजून वाईट होऊन बसेल. जिथे जिथे शांततेची गरज असते तिथे तिथे शांत बसणे आपल्या फायद्याचं ठरेल.
आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुखाची शांतता असते .फक्त ती अनुभवली कशी पाहिजे हे आपल्याला समजले पाहिजे जसे की सकाळी उठून चालायला जाणे त्यामध्ये जे सुख असते जी सकाळची शांतता असते ती तुम्हाला कुठे म्हणजे कुठेच भेटणार नाही.चालून आल्यानंतर इतके काही फ्रेश वाटत असते की दिवसभर आपण दमलोय हे सुद्धा आपल्याला जाणवत नसते.आमी रात्री किती पटकन आपण झोपून जातो हे सुद्धा आपल्याला समजणार नाही.मन शांत ठेवण्यासाठी दिवसभर आपण आपल्यासाठी काय करतोय आणि त्यातून आपल्याला पाहिजे ते सुख भेटणारे का हे बघावे.
स्वतःसाठी एक दिनचर्या ठरवावी आणि त्याप्रमाणे वागणे हे ठरवावे.आपल्या शांत असण्याचा फायदा कोणी घेऊ नये इतके आपण आयुष्यात सतर्क असले पाहिजे.
कुठेही फिरायला गेलो तर त्या फिरण्यामध्ये आपले मन रमवावे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगावे.
शांत राहून आयुष्य जगणारे त्यांचं मन नेहमी शांत असते योग्य ते विचार करण्यात त्यांचा वेळ ते घालवत असतात. शांत बसणारी माणसे ही त्यांच्या वर होणारा अन्याय सहन करून जगणारी अजिबातच नसतात. फक्त ते शांत डोक्याने नेमके काय करायचे हा विचार करत असतात.
शांत असणारा की बसणारा माणूस हा नेहमी विचारी असतो. कुठे काय बोलायचं आणि योग्य ते बोलायचं हे त्या व्यक्तीला समजत असते. शांततेत असणारे सुख अनुभवत जगलो तर आपले आयुष्य अजून आनंदी होईल आणि आपले मन शांत राहील.
आपल्या आजूबाजूला शांतता असणे खुप गरजेचे आहे. शांततेमुळे जीवन हे सुखी असते.कारण तेव्हा आपले मन स्थिर असते.काही प्रश्नाची उत्तरे ही आपल्याला शांततेत भेटत असतात.उगाचच विनाकारण गोंधळ करून स्वतःला भेटत असलेली शांतता घालवू नये.शांतता आपल्या होणाऱ्या प्रगतीला हातभार लावत असतात.
प्रत्येक ठिकाणी आपली मते मांडत बसू नये.कुठेही बोलताना आपल्या शब्दाचा तोल सांभाळणे गरजेचे असते.आपल्या मनामध्ये जे जे काही आहे ते ते शांततेत असताना मनातून बाहेर काढून टाकणे म्हणजे आपल्याला शांतता भेटेल.काहीकाहींना सतत असं वाटत राहते की आयुष्यातली शांतता कुठेतरी निघून गेलीये ती आपल्याला भेटत नाही ये तर सगळ्यात आधी स्वतःला वेळ द्या. एका ठिकाणी शांत बसून मन स्थिर करावे.
सगळ्यात महत्वाची आपली मानसिक शांतता खुप गरजेची आहे.ती आपल्याला कोणत्या कामातून आपल्याला पाहिजे तो आनंद भेटतो त्यातून च भेटू शकेल.कोणत्याही गोष्टीसाठी संयम ठेवणे आणि तो कसा ठेवावं हे शिकणे गरजेचे आहे.
झोपल्यानंतरची शांतता सगळ्यांनाच हविहवीहशी वाटत असते कारण तेव्हा आपण इतके शांत असतो की आपल्या मनात कसलेच विचार नसतात.
स्वतःसाठी शांतता भेटण्यासाठी कोणाची गरज नसते मुळात ती स्वतः स्वतःसाठी मिळवायची असते.शांतता भेटण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नसते घराच्या कुठल्याही कोपऱ्यात बसलो तरी आपल्याला शांतता भेटेल.
आपल्या आवडी जपून आपल्याला काय पाहिजे ते समजणे गरजेचे असते.
खरंच जर मनातून मोकळे होयचे असेल तर स्वतः शांत राहून आनंदी कसे जगता येईल हे शोधणे गरजेचे आहे.
खरंच शांततेत असणारे सुख आपल्याला कुठेही भेटणार नाही.
पुजा काळेल

Follow My Facebook Page  Facebook 

 

Leave a Comment

Your email address will not be published.