स्वप्नांची जेव्हा धूळमाती होते.

स्वप्नांची जेव्हा धूळमाती होते.
अपेक्षांची गर्दी बघण्यासाठी थांबते.

स्वप्नांची जेव्हा धूळमाती होते.

आपण जे स्वप्न बघतो ते जर पूर्ण झाले नाही की आपल्याला वाईट हे वाटतच असते.आपण पाहिलेल्या स्वप्नासाठी आपण आधी खुप कष्ट घेतलेले असतात आणि ते पूर्ण करण्यासाठी खुप रात्रदिवस मेहनत घेतलेली असते.त्या स्वप्नांमध्ये आपल्या खुप अपेक्षा असतात की त्या अपेक्षा किंवा ईच्छा पूर्ण करण्यासाठी आपण धडपडत केलेली असते.त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की अपेक्षाभंग होतो आणि अर्थात आपण मनातून खुप दुखावले जातो.परिणामी आपण बघितलेल्या स्वप्नांसाठी खुप प्रमाणाबाहेर धडपड केलेली असेल पण आपल्याला ते स्वप्न पूर्ण होण्याआधीच जर स्वप्न अर्धे राहिले तर आपल्याला खुप त्रास होतो परिणामी आपल्याला मानसिक आजाराचा सामना करावा लागतो.

स्वप्न पूर्ण होण्यासाठी आधी आपल्याला त्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा लागतो.त्यासाठी प्रचंड मेहनत ,अपार कष्ट हे सगळे केल्यानंतरच आपल्याला यश भेटेल.यश येण्याआधी जेवढ्या वेळा आपल्याला अपयश येते त्या प्रत्येक अपयशातून नवनवीन शिकलेल्या गोष्टी, वेगवेगळे अनुभव यातून आपण यशाची एक एक पायरी आपण चढत असतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या स्वप्नांच्या पाठीमागे धावाव लागते.

स्वप्न पूर्ण झाले तर यश भेटले म्हणून कौतुक करणारी लोक हे आपलेच असतात. परंतु जर आपण प्रत्येक वेळी आपल्याला अपयश येत असेल तर आपल्याला बोलणारी लोक अनेक असतात. आपण कसे प्रकारे हरतोय आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी का यश येत नाही आपल्यातला कमीपणा दाखवून देणारी खुप लोक असतात. अशा वेळी त्या लोकांच शांत ऐकून आपल्यातल्या चुका दाखवून देऊन आपण त्या सुधारल्या की त्यांना बोलायला काहीच एक उरत नाही.

स्वप्न हे अनेक प्रकारची आहेत.प्रत्येक स्वप्न हे खुप वेगवेगळे असतात.आपल्याला पुढे आयुष्यात बसून खाता यावे यासाठी काहीतरी स्वतः नोकरी करून तरुण वयात माणूस पैसे कमावत असतो. झोपेत पडणारी स्वप्ने म्हणजे काही स्वप्ने हे भीतीदायक, काही आपल्या आयुष्यात सुख देणारी स्वप्ने असू शकतात.कधी कधी दिवसभर आपल्या डोक्यात काय सुरु असते तेच आपल्या डोक्यात असते आणि तोच विचार हळू हळू आपल्या स्वप्नात येत असते.

स्वप्न हे आपल्या रात्रीच्या शांततेच्या झोपेतच पडत असतात.एकदा का आपण आयुष्यात काय करायचे हे जर आपण आपल्या स्वप्नात पहिले तर त्यानंतर आपल्याला त्या स्वप्नांसाठी काय करावे लागेल ते सतत करत राहणे आणि ते स्वप्न प्रत्यक्षात जेव्हा खरे होईल तेव्हा ते स्वप्न दुसऱ्यांना सांगावे.
कदचित ते स्वप्न  म्हणून आपण दुसऱ्याला सांगितले आणि आपण ते पूर्ण करू शकलो नाही तर आपल्यातला कमीपणा दुसऱ्याला कधीच समजणार नाही हे बघावे.

स्वप्नांची ओळख करून घेणे आपल्या स्वतः च्या स्वप्नांना आपल्याला काय कराव लागेल त्यासाठी स्वतः प्रयत्न करणे. पाहिजे ते भेटण्यासाठी आधी आपल्याला त्यासाठी मेहनत करावी लागते.

स्वतःसाठी आणि परिवारासाठी आयुष्यात काहीतरी चांगल होण्यासाठी स्वप्न बघून ती पूर्ण करणे हे आपले काम आहे.

एखाद्या गोष्टीचा आपण दिवसभर विचार केला तर तेच विचार रात्री झोपताना आपल्या डोक्यात असू शकतात आणि तेच विचार आपल्या स्वप्नामध्ये यायला लागतात.

पडलेले स्वप्न हे आयुष्य घडवणारे असतील तर ते स्वप्न पूर्ण करून आपली स्वतः ची ओळख आपण निर्माण केली पाहिजे.

स्वप्न हे जे आपल्या डोक्यात विचार चालू असतात त्याचीच स्वप्ने पडत असतात. स्वप्ने ही एक आयुष्य घडवणारी बदलून टाकणारी असतात. काही स्वप्ने विचित्र आणि भीतीदायक असतात.झोपताना आपल्याला कसली भीती वाटत असली तर तेच चित्र आपल्या स्वप्नात येत असते. स्वप्नापासून आपल्याला काहीतरी मिळवायचे असते.त्या स्वप्नासाठी आपल्याला प्रचंड मेहनत ही करावी लागते. स्वप्न हे बघितले की ते पूर्ण करण्याचा ध्यास आपण घेतला पाहिजे.

चांगली स्वप्ने आपले आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणत असतात. स्वप्ने आपल्याला खुप गोष्टी शिकवून अनुभव देत असतात.

मोठी स्वप्ने बघण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे.इतरांना मदत करण्याची स्वप्ने सुद्धा बघून ती पूर्ण करणे म्हणजे आपण सामाजिक कार्य केल्याचं समाधान आपल्याला भेटेल. पुढे जाऊन सगळ्या गोष्टींचं सुख भेटण्यासाठी आपली आर्थिक बाजू आपल्याला कशी मजबूत करता येईल हे बघणे सध्याची गरज आहे.त्यासाठी माणूस धावपळ करतोय आणि दैनंदिन जीवन कसे व्यवस्थित राहील यासाठी सगळे धावपळ करून जीवन जगत असतात.

भीती वाटत असलेली स्वप्ने पडली आणि त्या भीतीतून बाहेर पडण्यासाठी त्या गोष्टींची भीती कशी घालवता येईल हे बघणे.
स्वतःचे नशीब स्वतः घडवून आयुष्यात काहीतरी करून दाखवणे हे आपल्याच हातात असते. काही स्वप्ने पूर्ण करू शकलो नाही तर वाईट वाटून घेऊ नये. जे आपल्या हातून शक्य आहे त्यासाठी प्रयत्न करून स्वप्ने पूर्ण करणे.

आपल्याला पडलेले स्वप्न दुसऱयाला सांगता यायला पाहिजे. ते स्वप्न ऐकताना त्याला सुद्धा काहीतरी मजेशीर वाटू शकेल असं पाहिजे.

छान आणि प्रसन्न वाटणाऱ्या स्वप्नांची दुनिया झोपेत संपूच नये असं वाटत असते.झोपेतून उठल्यानंतर पडलेली स्वप्न ही खरंच काही मजेशीर असतील तर आपल्याला कोणाला तरी सांगून तो पण थोडा आपल्या मुळे हसेल.काही जणांना स्वप्नांच्या दुनियेत रमून जायला खुप आवडते.कदाचित काही गोष्टीत अशा असू शकतात की आपल्याला खऱ्या आयुष्यात ते स्वप्न पूर्ण करू शकलो नाही तर किमान त्या स्वप्नांच्या दुनियेत रमून एक आनंद आपल्या मनाला देऊ शकतो.

स्वप्न पूर्ण नाही झाले तर खुप जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नये. त्या स्वप्नांसाठी कदाचित कुठेतरी आपण कमी पडत असतो म्हणून पाहिजे तितक्या लवकर आपल्याला यश भेटत नसते.

पुजा काळेल.

Leave a Comment

Your email address will not be published.