तुझा मला आधार आहे.

तुझा मला आधार आहे.
हेच जीवनाचे सार आहे.

आयुष्यात सगळ्यांनाच कोणाचा तरी आधार असतो. मग तो आधार आपल्या आईचा,वडील,भाऊ ,बहीण, खुप जवळचे कोणीतरी अशा लोकांचा आधार हा सगळ्यांनाच असतो. आधार म्हणजे काय ?
आधार म्हणजे कोणीतरी आपल्याला समजून घेणारे, प्रत्येक वेळी आपल्यावर येणाऱ्या संकटात आपल्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारे अशी ही माणसे असतात.

तुझा मला आधार आहे.

आधार ही एक आपल्या आयुष्यात एक काळाची गरज झालेली आहे. आयुष्यात थोडे काही वाईट झाले की आपण एवढे खचून जातो की आपल्याला त्या वेळी काहीही समजत नसते.मग अशा वेळी आपल्या हक्काचं कोणतरी आधार देणारी व्यक्तीच आपल्याला मदत करू शकते. आधार असणे म्हणजे कोणीतरी आपले आपल्याबरोबर आहे हे आपल्याला माहित असते.

आयुष्यात तरुण पिढी इतके विचार आणि काळजीने त्रस्त आहेत की ते कोणाचा तरी आधार शोधत असतात.की जेणेकरून त्यांना काही झालं की आपल्या सोबत आपल्याला साथ देणारी व्यक्ती सोबत असते. तरुण पिढी सगळ्याच गोष्टी बोलून दाखवत नसते. त्यांच्या मनात सतत काहीतरी कसलेही विचार चालू असतात.यासाठी त्यांना सतत कसे बोलत करता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आधार म्हणजे अनेक प्रकारे आधार आपण दुसऱ्यांना देऊ शकतो . त्यातलेच एक सांगायचे तर ज्याची आज सगळ्यांनाच गरज आहे तो म्हणजे भावनिक आधार.

भावनिक आधार देणे म्हणजे काय ?

एखादा जर त्याच्या आयुष्यात खुप दुःखी असेल , किंवा त्याच्या आयुष्यात खुप मोठी दुःखी घटना घडली असेल तर त्याला भावनिक आधार कसा देता येईल याचे ज्ञान हे प्रत्येकाला असलेच पाहिजे. कारण हे जर आपण करू शकलो नाही तर आयुष्यात आपण ही गोष्ट शिकायची राहून जाईल. आणि असे प्रसंग हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात त्यामुळे या गोष्टी शिकल्याचा पाहिजे.

भावनिक आधार कशा पद्धतीने देता येईल.?

प्रथम त्या व्यक्तीसोबत कसे आणि काय बोलावे याच विचार करून च त्या व्यक्तीकडे जावे. आपल्या शब्दात त्या व्यक्तीला मोठा दिलासा वाटला पाहिजे. त्या व्यक्तीला त्यातून बाहेर पडण्यासाठीचे आपले शब्द पाहिजे. उगाचच झालेल्या किंवा होऊन गेलेल्या गोष्टींवर त्याच्या सोबत चर्चा करणे चुकीचे होईल. आपण भावनिक आधार कशा पद्धतीने देतोय हे खुप महत्वाचे असते त्यामुळे आपल्या बोलण्यात कुठेही वाईटपणा नसावा . आपल्या बोलण्यात प्रेम समजूतदारपणा असलाच पाहिजे.

दुसरा आधार म्हणजे आर्थिक आधार.

कधी कोणाला आर्थिक आधार आपल्याकडून पाहिजे असेल आणि आपल्याकडून ते शक्य असेल तर तो आर्थिक आधार त्या व्यक्तीला करून त्या माणसाला आपल्याकडून मदत मिळाली याच समाधान आपल्या मनात असेल. त्यामुळे अशी मदत करण्याच भाग्य जर आपल्या भेटणार असेल तर अशी मदत ही नेहमी करावी. अशी मदत जर आपण चार चौघात न सांगता केली तर कुठेतरी आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा ती मदत आपल्याला आपोआप भेटत असते, कारण आधी आपण कोणाला तरी मदत केलेली असते. चांगल्या कामाचं फळ हे आपल्याला आपोआप भेटत असते.

आजकाल आधार ही आपली गरज बनलेली आहे. आपल्याला आधार जेव्हा पाहिजे तेव्हा आधार देणारी माणसे सुद्धा आपल्या सोबत असली पाहिजे आणि जेव्हा आपल्या आधाराची दुसऱ्याला किंवा आपल्या व्यक्तीला खुप गरज असते तेव्हा सुद्धा आपल्याला मनापासून आधार देता सुद्धा आला पाहिजे. जशी आपण आपल्याला कोणीतरी वेळ असते तेव्हा आधाराची अपेक्षा आपण करत असतो तेव्हा आपल्याकडून सुद्धा कोणीतरी ती अपेक्षा ठेवत असते हे लक्षात ठेवले पाहिजे.

आधार म्हणजे कोणाला तरी दुःखी प्रसंगातून किंवा नैरश्यामधून कोणाला तरी बाहेर काढणे आणि यासारखे चांगले काम आपण जर करत राहिलो तर आपण सुखी आणि समाधानी राहू शकतो. कोणाला मदत करण्याची भावना ही आपल्या मध्ये आपोआप निर्माण झाली पाहिजे .ती मदत करत असताना कोणतीही आणि कसलीही अपेक्षा न ठेवता मदत करायला शिकले पाहिजे.
आधार देणे म्हणजे चार शब्द त्या माणसाला प्रेमाने समजून घेऊन त्याला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवायचे असतात.

आपल्याला आपल्या कुटुंबात आधार देणारे असतातच.वेळोवेळी ते आपल्याला समजून घेत असतात.आपल्याला काय पाहिजे यासाठी ते आयुष्यभर कष्ट करत असतात.परंतु आपण जसे जसे मोठे होत जातो तसे तसे बाहेरच्या गोष्टी घरात सांगायला नको वाटत असते. त्यामुळे अशा वेळी बाहेरचे पण जवळच असे कोणीतरी आधार देणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असलीच पाहिजे.

मानसिक आधार हा सुद्धा आपल्याला लागतोच.मानसिक आधार म्हणजे एखाद्या गोष्टीतून बाहेरच पडायच नाही आणि आणि त्यातच अडकून राहायचं यामुळे आपण मानसिक आजाराला बळी पडत असतो.आताच्या आयुष्यात आपले मानसिक आरोग्य जपणे हे आपल्या हातात असते.त्यातून बाहेर पडायचा मार्ग आपण शोधायचा असतो.आपण त्या गोष्टीतून बाहेर कसे येऊ या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. ज्या काही गोष्टी मनात आहे त्या बोलून दाखवणे गरजेचे आहे.

घरी आपल्याला आई वडील यांचा सर्वाधिक आधार असतो.त्यांच्याशिवाय आपले आयुष्य नसते.जसा आपल्याला त्यांचा आधार असतो.तसे आपणही त्यांचा आधार बनून राहायला शिकले पाहिजे.

तसेच आपले मित्र मैत्रीण यांचा सुद्धा आपल्याला वेळोवेळी भावनिक आधार आपल्याला भेटत असतात.असे मित्र मैत्रीण आपण आयुष्यात कमवायला शिकले पाहिजे.त्यामुळे आपल्याला कोणती गोष्ट कोणाला सांगायची असेल तर ती व्यक्ती अचानक शोधायची गरज पडणार नाही.

आधार असला की कुठेतरी आपला माणूस आपल्यसाठी असतो हा एक मानसिक आधार आपल्यासाठी असतो.असा कोणीच नाही ज्याला आधाराची गरजच नसते.अगदी जन्मापासून ते आपले आयुष्य असेपर्यंत सगळ्याना आधाराची गरज असतेच असते.त्यामुळे मला कोणाच्या आधाराची गरज नाही अशा विचारामध्ये कधीच असता कामा नये.
आपल्याला कोणाची गरज ही कधी सांगून येत नाही.प्रसंग जसा अचानक येतो त्याचप्रमाणे कुठल्या माणसाची मदत लागणारे हे सुद्धा आपल्याला त्याच वेळी समजत असते.त्यामुळे कधी कोणाची गरज पडेल आपण सांगू शकत नाही.यामुळेच शक्यतो कधी कोणावर राग धरून बसू नका.
कोणाला जर आपली गरज असेल तर धावून मदत करणे हे आपले कर्तव्य आहे

पुजा काळेल

Leave a Comment

Your email address will not be published.