तुम्ही मित्र कसे बनवता; कोणत्या गोष्टी त्या मित्रांमध्ये बघता?

तुम्ही मित्र कसे बनवता; कोणत्या गोष्टी त्या मित्रांमध्ये बघता? आयुष्याच्या टप्प्यावर मित्र कधीही ठरवून केले जात नाहीत.कळत नकळत सगळ्यांसोबत मैत्री होत जाते.मैत्री हे एक खुप गोड नाते आहे.मैत्री ही निस्वार्थी असावी.व्हाट्सअप आणि फेसबुक वर हजारो मित्र असण्यापेक्षा मोजकेच पण चांगले मित्र असावे.मित्राच्या मनात आपले स्थान निर्माण झाले पाहिजे नुसते लाईक्स आणि कंमेंट्स ने काही ही उपयोग नसते. मैत्री ही विश्वासावर अवलंबून असते.जर विश्वासघात झाला तर आयुष्यभराची मैत्री तुटायला वेळ लागत नाही.जुने मित्र काही कारणाने संपर्कातातुन कमी होत जातात पण तेवढेच नवीन मित्र रोज नव्याने भेटत असतात हेही तितकेच खरे आहे.
जेव्हा मैत्री होते तेव्हा त्याचे विचार आपले विचार कुठे तरी सहमत असतात.कोणत्याही आनंदच्या प्रसंगी पहिला आपल्याला मित्र आठवला पाहिजे असा मित्र असावा.हक्काने त्याच्यावर रागवता यायला पाहिजे.वेळप्रसंगी कोणते संकट असेल तर सगळ्यात पहिला त्याला फोन जातो असा मित्र हवा.मित्रा सारखे प्रेमळ नाते खरंच खुप मनाला शांत करते.

तुम्ही मित्र कसे बनवता; कोणत्या गोष्टी त्या मित्रांमध्ये बघता?

 

तुम्ही मित्र कसे बनवता; कोणत्या गोष्टी त्या मित्रांमध्ये बघता?

कोणाच्या काहीही सांगण्यावरून मैत्री ही नं तुटणारी पाहिजे.मैत्री किती खरी आहे हे वेळोवेळी सिद्ध करत बसण्याची गरज नाही पडली पाहिजे.
पुजा काळेल

Leave a Comment

Your email address will not be published.