वाद हा किती आता वाढवू ?

वाद हा किती आता वाढवू ? मनात किती आता कटुता साठवू.

वाद हा किती आता वाढवू ?

कोणत्याही गोष्टी वर कोणासोबत वाद झाला तर शक्यतो तो वाद जास्त न वाढवता तो कमी कसा करता यासठी प्रयत्न करावे.मनात जास्त कटुता ठेवून आपण आपले आयुष्य जगात असू तर आपण कधीच आनंदी राहू शकत नाही.
वाद हा कोणाबरोबर पण होऊ शकतो.वादाचे कारण हे जर खरंच वाद घालण्यासारखे असेल तर आपण का वाद घालतोय हे समोरचा समजून घेईल.परंतु कारण नसताना आपण कोणासोबत वाद घालत असू तर आपल्याला का आणि कशासाठी समजून घेईल.
आजकाल तर दिवसभर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घरात असणारी मुले आपल्या आईसोबत वाद घालतात पण या गोष्टीला वाद म्हणता येईल का ? कदाचित विचार न पटल्यामुळे ते एकमेकांना प्रतिक्रिया देत असतील परंतु जर दोघांनी पण जर एकमेकांच ऐकले नाही किंवा एकाने समजून घेतले नाही तर हा विषय नक्कीच वादाचे कारण बनू शकते. वादाच्या परिस्थिती कोणीतरी एकाने शहाणे बनून ती परिस्थिती जास्त न ताणता वाद कसा थांबवता येईल हे बघणे गरजेचे आहे.
कोणत्यातरी न पटलेल्या गोष्टींवरून कोणासोबत तरी वाद घालून आपली मते इतरांना पटवून देण्याचा जर आपण प्रयत्न करत असलो तर त्याला वाद म्हणता येणार नाही.आपल्या मनात नक्की काय चालू आहे.आणि आपल्या कडे परिस्थिती हाताळण्यासाठी कोणते कोणते वेगळ्या प्रकरची उत्तरे आहे हे आपण सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत असतो आणि तो केलाच पाहिजे भले कोणी कितीही म्हणले की किती हा वाद घालतोय किंवा हा किती बोलतोय असे कोणीही म्हणले तरी आपले चांगले विचार चांगली मते आपण व्यक्त केलीच पाहिजेत.

घरातल्या किंवा बाहेर कोणाशी तरी आपला वाद हा होतच असतो.असा कोणताही मनुष्य नाही की ज्याचा कोणासोबत च वाद नाही. आयुष्यात अनेक घटना घडत असतात.त्याच्या संबंधीत आपले वाद असतात. काही वेळेस नात्यामध्येले वाद हे न संपणारे असतात.हे वाद दैनंदिन जीवनात विचार जरी केला तरी त्याचा आपल्याला त्रास होतो.त्यामुळे ज्या गोष्टीचा विचार करून सुद्धा परिस्थिती बदलणारी नसेल तर त्या गोष्टीचा जास्त विचार करू नये.

आयुष्यात वाद किंवा कोणासोबत तरी जेव्हा जेव्हा आपण भांडण करत असतो तेव्हा तेव्हा जवळचा माणूस आपल्या पासून लांब जात नाही.नात्यामध्ये भांडण हे जास्त काळ टिकून न देता लगेच तिथल्या तिथे विसरून पुढे जावे. नात्यामध्ये कधीतरी भांडणे,रुसवे ,फुगवे हे गरजेचेच आहे त्याशिवाय नात्यात प्रेम हे फुलून येत नाही.

वाद हे कोणासोबत सांगून होतं नाही.खुप चांगले संबंध असताना अचानक त्या व्यक्ती सोबत आपले खटके उडू लागतात.मग त्या व्यक्ती सोबत का पटेनासे होते कदाचित त्याच्याकडून काही तरी चुका होतं असतात किंवा तो आपल्या बाबतीत काहीतरी चुकीचे गैरसमज पसरवत असतो आणि हे आपल्याला नंतर समजते मग अशा वेळी वाद हा होणारच. जर आपल्याला समजतंय की त्या व्यक्तीला आता आपल्या सोबत राहताना काहीतरी खटकतंय आणि तरी आपण त्याच्या सोबत राहण्याचा प्रयत्न जर आपण करत असू तर नक्की करावा परंतु आपण ज्या काही चुका करतोय त्या सुधारून त्या व्यक्तीसोबत राहण्याचा प्रयत्न करावा.

जेवढी आपल्या मनात कोणाबद्दल कटुता असेल तेवढे आपले मन अस्थिर आणि शांत नसते. आपल्या मनातच कोणाबद्दल वाईट विचार असतील किंवा कोणाचं चांगले झालेले आपल्याला बघवत नसेल तर आपल्याच मनात दोष आहे.आपण कोणाचं तोंडभरून कौतुक जर करू शकत नसेल तर कदाचित आपले सुद्धा कौतुक करणारे कोणी नसेल. आपण जेवढे दुसऱ्याच चांगले होउदे असा विचार आणि चांगली गोष्ट केल्यावर तीच भरपूर कौतुक या दोन गोष्टी आपण आयुष्यात शिकलेच पाहिजे तरच आपला कौतुक करणारी माणसे आपल्या आजूबाजूला असतील. जेवढे आपण दुसऱ्यासाठी करू तेवढेच आपल्यासाठी मदत करायला माणसे धावून येतात.जेवढे आपण चांगले काम करू तेवढेच आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडत असतात.

कधीच कोणाकडुन कोणतीच अपेक्षा जर ठेवली नाही तर वादाचे प्रमाण कमी होऊ शकतात.आपण स्वतः साठी स्वतः च्या अपेक्षा ठेवायच्या असतात जेणेकरून स्वतःचा अपेक्षाभंग होणार नाही.आणि कोणीतरी आपल्याला दुखवले या भावनेतून जावे लागणार नाही.

वादाचे कारण आपण असलो तर आपल्या हातून काय
चुका झाल्या याचा एकदा तरी रोज विचार झालाच पाहिजे.स्वतःमध्ये सुधारणा होण्यासाठी आपल्या कडून काय चुकतंय आणि आपला स्वभाव अजून कसा चांगला होईल याचा विचार करावा तरच स्वतः मध्ये सुधारणा होतील. जेव्हा आपण स्वतः योग्य असतो तेव्हाच आपण दुसऱ्याच्या चुका दाखवून देऊ शकतो.जेव्हा आपले विचार चांगले असतात तेव्हा आपण दुसऱ्याचे सुद्धा चांगले विचार ऐकून घेतले पाहिजे.जेव्हा आपण चुकतो आणि समोरचा आपल्या चुका ऐकवतो तेव्हा त्यांची बोलणी खाण्याची सुद्धा आपली तयारी पाहिजे. जसे दुसरा चुकतो तसेच आपल्या हातून सुद्धा चुका या होतं असतात या गोष्टी आपल्याला समजलेच पाहिजे. नेहमी आपण बरोबर वागतो आणि दुसरा कसा चुकीचा या भावनेत आपण अडकलो तर ते पूर्णतः चुकीचे असते.आणि त्यामुळे आपले खुप नुकसान होतं असते.

कोणत्याही गोष्टीचा वाद हा कुठेपर्यंत नेऊन वाढवावा, वाद हा संपवून टाकायचा की नाते हे आपल्या हातात आहे. वाद हा खरंच काहीतरी कारणाने जर होतं असेल तर तुम्ही रागामुळे कोणासोबत तरी वाद घालत असतात.
वाद हा आपल्यामुळे होतं असेल तर राग शांत झाल्यावर शांत होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊन न देता वाद कसा आटोक्यात ठेवता येईल याचा विचार करावा.  वादामुळे समोरचा माणूस आणि स्वतः पण आपण अस्वस्थ असतो त्यामुळे वाद न घालता शांत बसून स्वतःचे मन शांत ठेवावे. वादामुळे आपले संबंध कायमसाठी बिघडून जातात. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती वर वाद घालणे सोडून परिस्थिती नाजूक पणे हाताळण्यात सुद्धा आपण तयार पाहिजे.

परिस्थिती मुळे आपण काळजीत असतो आणि कळत नकळत आपल्या हातून चुका या होतं असतात. म्हणून आपण चुकीचे नसतो.परिस्थिती मुळे आपल्याला तसे वागावे लागते आणि हे आपण असे का वागलोय हे समोरचा समजून घेणाराच असतो असे सुद्धा काही नसते . त्यामुळे कोणी जरी समजून घेतले नाही तर आपण स्वतः स्वतःला समजून घेता आले पाहिजे तर आपण आपले आयुष्यात सुखी राहू शकतो. म्हणून जरी आपण कोणामुळे खुश नसेल होतं तर स्वतः स्वतःसाठी खुश कसे राहता येईल याचा विचार करावा.

पुजा काळेल

Leave a Comment

Your email address will not be published.