विचार सारे उधळले होते.

विचार सारे उधळले होते.
मी माझेच मला छळले होते.

विचार सारे उधळले होते.

विचार हे जास्त अतिप्रमाणात झाले की त्याचा आपल्याला इतका त्रास होतो की आपण नकारात्मकडे झुकतो. विचार  हे कधी कधी आपल्याला त्रास देणारे असतात.कितीही कोणत्याही गोष्टीचा विचार करून ती गोष्ट बदलणारी नसेल तर त्याचा त्रास आपण उगाच च करून घेत असतो परंतु ते आपल्याला समजत नसते.आणि यातून सगळेच जण जात असतात.एकदा का आपली विचार करायची सहनशक्ती संपली की की आपोआप ते आपल्या बाहेर येत असतात.कारण सहनशक्ती जेव्हा संपलेली असती तेव्हा आपण आधी खुप सहन केलेले असते त्यामुळे आपण आपला राग व्यक्त करत असतो, आपल्या मनात जे काही असते तेव्हा आपण सगळे बोलून व्यक्त होतं असतो.आणि असे विचार खरंच उधळेले जातात आणि समोर कोण व्यक्ती असेल त्या व्यक्तीवर कदाचित आपला राग आपण व्यक्त करत असतो.
अशा त्रस्त विचारांनी आपण जर त्रासलेले असाल तर त्या विचारांमधून बाहेर कसे पडता येईल हे बघणे गरजेचे आहे.एकाच गोष्टीचा विचार करून जर आपल्या मनाला त्रास होतं आहे हे समजून सुद्धा आपण उगाच त्रास करत राहिलो तर आपण नक्कीच नैराश्य मध्ये जाऊन आणखी जास्त त्रास होईल. जर आपणच आपल्याला त्रास करून घेत राहिलो तर आयुष्यात आपण कधीही सुखी होऊ शकणार नाही.जर आपण मनाने सुखी किंवा आनंदी राहिलो नाही तर त्याचा इतर कोणालाही फरक न पडता त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे.

विचार हे कधीही आपल्या मनात यायला सुरवात होते. कधी झोपताना तर कधी एकटे असताना,किंवा सगळे सोबत असताना सुद्धा आपले विचार आपला पाठलाग सोडत नाही.त्यामुळे आपले मन शांत कसे राहील याचा विचार करणे गरजेचे आहे.

विचार करायचाच नाही असे काही ठरवून करता येत नाही.विचारांना आपण कधीच थांबवू शकत नाही.

मनात येणारे विचार जर सकारात्मक असतील तर आपण मनाने शांत आणि समाधानी असतो.जर आपण सकारात्मक असलो की सगळे लोक आपलीकडे येऊन ते स्वतः सुद्धा सकारात्मक होण्याचा प्रयत्न करत असतात.परंतु जर आपले विचारच नकारात्मक असतील तर आपल्याला कोणीही विचारणार नाही. तेव्हा लोक म्हणतील की यांच्याकडे गेलो की आपले विचार नकारात्मक होतात तो सतत काळजी मध्ये असतो जर आपण असे असलो की लोक आपल्यापासून पळ काढतात आणि तेव्हा आपण एकटे पडतो.
आपण नकारात्मक विचार करत असलो की त्याचे परिणाम हे आपल्या शरीरावर होतं असतात आपल्या शरीरावर एक प्रकारे आळस आणि ताण आलेला असतो.

जर चांगले विचार असतील तर आपल्याला रात्रीची शांत झोप आणि चांगले आरोग्य भेटेल.तुम्ही कसे वागता बोलता आणि तुमचे विचार कोणत्या पद्धतीचे आहे हे प्रत्येक वेळी आपल्याला सिद्ध करावे लागते किंवा समोरचा माणूस आपल्या बोलण्याचे निरीक्षण करत असतो. त्यामुळे आपण नेहमी आपले विचार हे चांगलेच आणि आपले चांगले विचार दुसऱ्यांना नेहमी सांगितले पाहिजे. त्या विचारांचं कौतूक हे झालेच पाहिजे.

ताणतणावातून मुक्त होण्यासाठी नेहमी चांगल्या विचार ,प्रेरणा देणारी पुस्तकं ही आपल्या जवळ असलीच पाहिजे. पुस्तकं आपल्याला विचार करायला भाग पाडत असतात.तसेच आपले विचार मजबूत होण्यास मदत होते.शिवाय आपल्या शब्दसाठा हा पुस्तकांमुळे नेहमी वाढत असतो.आपल्याकडे भरपूर शब्द असले की कुठे काय बोलायचे ते आपल्याला समजत असते.काय बोलायचं हे आपल्याला आयत्या वेळी समजत असते. तसेच वेळेचे आणि आपल्या कामाचे योग्य पद्धतीने नियोजन करा. आनंदी राहण्यासाठी विनोदी पुस्तके वाचून हसत राहण्याचा प्रयत्न करा.रोज सकाळी सकाळी उठून ताज्या वातावरणाचा अनुभव घ्यावा.जी सकाळची शांतता असते ती आपल्याला कुठेच भेटणार नाही त्यामुळे सकाळी झोपून राहण्यापेक्षा एक दिवस सकाळी उठून मन कसे प्रसन्न राहते याचा एकदा तरी अनुभव नक्की घ्यावा.

याबरोबरच आपली तुलना जर दुसऱ्या लोकांबरोबर करायची सवय जर तुम्हाला असेल तर ती थांबवा. जर ही सवय असेल तर या गोष्टीचा त्रास आपल्यालाच होणार आहे. नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत जा.आपल्या आजूबाजूला चांगले विचार असणारी माणसे आणि आनंदी असणारी माणसे आपल्या आजूबाजूला असली पाहिजेत.आणि आपल्यामुळे समोरचा माणूस सुद्धा आनंदी होयला पाहिजे आपण आनंदी असतो तेव्हा आपल्याला आजबाजुच सगळेच छान दिसते..

दिवसभरात आपण किती नकारात्मक विचार करतो याचा आढावा प्रत्येकानं घेत राहावा.म्हणजे आपल्याला समजत राहील की आपण किती प्रमाणात नकारात्मकडे जात असतो. आपल्या मनात किती राग ,किती अंहकार ,किती वाईटपणा किती प्रमाणात ठासून भरलेला असतो हे सुद्धा प्रत्येकाने बघावे. नेहमी आपण आपले चांगले गुण दुसऱ्याला सांगत असतो पण जे वाईट गुण आहे ते आपल्यालाच माहित असतात. परंतु त्या वाईटपणाचा आपण कधीच विचार करत नाही. त्या गोष्टी आपल्या मनातून कशा पद्धतीने (अगदी पूर्ण बंद होणार नाही) पण कशा प्रकारे कमी करता येतील यासाठी प्रयत्न करावे.

आपल्यातले वाईट गुण हे जर आपण सुधारणार असलो तर कदाचित आपले चांगले गुण दुसऱ्याला दिसतील आणि कदाचित त्याच कौतुक म्हणून ते आणखी चार जणांना सांगतील. ही नक्कीच चांगली गोष्ट असेल आपल्यासाठी.

आपले चांगले विचार हे आपल्या पुरते मर्यदित न राहता सगळ्यांसोबत बोलायला शिका. वाईट विचार हे आपल्या माणसाला सांगून त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. वाईट विचारांचा प्रभाव आपल्यावर जास्त काळ टिकू नं देता ते विचार बाहेर च्या बाहेर टाकून द्यायला शिका.

चांगल्या विचारांची माणसे आपल्या आजूबाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं अशी माफक अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःच स्वतःला समजून घेता आले पाहिजे. सतत आपल्याला कोणीतरी विचारले पाहिजे अशी जर अपेक्षा तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही स्वतःला दुःखी करून घेत राहताल. नेहमी स्वतःला खुश ठेवत आयुष्या जगले पाहिजे.जर आपण सुखी असलो तर आपल्याला आपल्या आजूबाजूच वातावरण सुखी दिसेल.

विचार हे आपले स्वतःचे पाहिजे तर आपल्याला ते समोरच्याला पटवून देता येतात. विचार हे दुसऱ्यांना प्रवाभीत करणारे असले पाहिजे. आपण जेवढे वैचारिक असू तेवढी आपल्या बुद्धीला चालना भेटत जाईन.

चांगले विचार आत्मसात करून ते चांगल्या पद्धतीने स्वतः आधी आत्मसात केले पाहिजे मग ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे.

पुजा कळेल.

3 thoughts on “विचार सारे उधळले होते.”

Leave a Comment

Your email address will not be published.